ETV Bharat / city

मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली; परवानगी नसली तरी मनसे आंदोलनावर ठाम - मालमत्ता करमाफीसाठी मनसेचे आंदोलन

2017 च्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने दिलेल्या मालमत्ता कर माफ करण्याच्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. परवानगी नाही मिळाली तरी आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.

ravi more
रवि मोरे
author img

By

Published : Sep 12, 2020, 10:15 PM IST

ठाणे- महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने दिलेल्या मालमत्ता करमाफीची आठवण करून देण्यासाठी मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनांला स्थानिक पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मनसेच्या कार्यकर्त्याचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे भविष्यात मनसे कोणता निर्णय घेणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

रवि मोरे, शहराध्यक्ष मनसे

काही दिवसांपूर्वी मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाणे महापालिकेच्या परिसरात मालमत्ता करासंदर्भात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. ठाणेकरांच्या हितासाठी असल्याने सत्ताधारी शिवसेनेने दिलेल्या वचनापैकी मालमत्ता करमाफीचे वचन पूर्ण केले नाही त्याची आठवण करून देण्यासाठी आंदोलन आहे. दरम्यान, आंदोलनाला परवानगी दिली नाही तरी ठाणे महानगरपालिकेच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आंदोलन करणार असल्याचा इशारा ठाणे जिल्हा पालघर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.

2017 च्या ठाणे महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेने 500 चौ.फुटांपर्यंत असणाऱ्या घराला मालमत्ता कर माफ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. पुन्हा महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आली की ही करमाफी देण्यात येणार असल्याचे वचननाम्यातून सांगण्यात आले होते. मात्र, साडेतीन वर्ष उलटूनही करमाफीची देण्यात आली नसल्याने याच वचननाम्याची आठवण करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या गुरुवारी महापालिका परिसरात आंदोलन घेडण्यात येणार होते. मात्र, नौपाडा पोलिसानी या आंदोलनाला परवानगी नाकारली असल्याने मनसे कार्यकर्ते पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून मनसे नेत्यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. गोरगरीब, झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांवर आर्थिक बोजा पडला असून आपत्तीकाळात सर्वच स्तरावर आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे. सर्वसामान्यांना अल्पसा दिलासा मिळावा, यासाठी हे आंदोलन असल्याचे यावेळी ठाणे मनसे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.