ETV Bharat / city

सोनसाखळीसाठी मित्राची हत्या करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

सोहम गजबे असे मृतक अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (२४) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार असे आरोपीचे नावे आहेत.

killing for gold chain
killing for gold chain
author img

By

Published : Jul 15, 2021, 4:57 PM IST

ठाणे - १४ वर्षीय मित्राला दोघा मित्रांनी बहाण्याने एका इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये नेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने विरोध केल्याने त्या दोघांनी त्याची गळा आवळून हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच बंद फ्लॅटमधील एका सोफ्यामध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सोहम गजबे असे मृतक अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (२४) आणि त्याचा अल्पवयीन साथीदार असे आरोपीचे नावे आहेत.

सोनसाखळी गहाण ठेवून आरोपींची मैजमजा

मृतक सोहम हा कल्याण-पडघा मार्गावरील बापगाव येथील जय मल्हारनगरमधील एका इमारतीत कुटुंबासह राहत होता. काल दुपारच्या सुमारास आरोपींनी मृतक सोहमला बहाण्याने बोलवून त्याला तो राहत असलेल्या परिसरातील एका इमारतीमधील बंद फ्लॅटमध्ये घेऊन गेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी खेचत असतानाच मृतक सोहमने विरोध केला. त्यामुळे दोघा आरोपींनी त्याची गळा आळवून हत्या करून त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढली आणि त्याचा मृतदेह त्याच ठिकाणी एका सोफ्यात लपवून ठेवला. त्यांनतर दोघानांही मृतकची सोनसाखळी कल्याणातील एका सोनाराकडे १० हजार रुपयात गहाण ठेवून त्यामधून मिळालेल्या पैशांतून मौजमजा केली.

काल दुपारपासून बेपत्ता असलेल्या सोहमचा शोध

काल दुपारपासून सोहम बेपत्ता असल्याची माहिती त्याच्या कुटुंबासह तो राहत असलेल्या परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे सायंकाळपासून त्याचा कुटुंबाने शोध केला. खळबळजनक बाब म्हणजे आपल्यावर संशय येऊन नये, म्हणून या आरोपींनीही कुटुंबासोबत फिरून त्याचा शोध घेत होते. अखेर रात्रीच्या सुमारास एका बंद फ्लॅटचा दरवाजा उघडून त्यामध्ये शोध घेतला असता, त्याचा मृतदेह सोफ्यामध्ये लपवून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनतर घटनेची माहिती पडघा पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनस्थळी धाव घेऊन पंचनामा करून सोहमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला आणि हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळी नातेवाईकांने दिलेल्या माहिती व संशयातून सोहमच्या दोघामित्रांना ताब्यात घेतले.

यापूर्वी सोहमचे सोन्याचे लॉकेट विकून मैजमजा

सोहमच्या हत्येच्या १० दिवसापूर्वीही आरोपींनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळीमधील लॉकेट विकून मौजमजा केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तर केवळ मौजमजा करण्यासाठी अल्पवयीन मित्राची हत्या करण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे. अधिक तपास पडघा पोलीस करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.