ETV Bharat / city

Infant sale नवजात बालकांची खरेदी-विक्री करणाऱ्या डॉक्टरला बेड्या; 'हा' धक्कादायक प्रकार आला समोर - ठाणे गुन्हे न्यूज

ठाणे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी ( Thane women and child officer ) आणि चाईल्ड लाईन ( Child Line Thane ) या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक पाठपुराव्यानंतर डॉक्टरच्या विरोधात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला. नवजात बालकाची विक्री करणाऱ्या पती-पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया संतोष आहिरे व संतोष अहिरे या असे अटक केलेल्या पती पत्नीचे नाव आहे.

डोंबिवली पोलीस स्टेशन
डोंबिवली पोलीस स्टेशन
author img

By

Published : Nov 25, 2021, 4:28 PM IST

ठाणे - डॉक्टरकडून नवजात बालकांची खरेदी-विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डोंबिवलीतील ( Dombivali Ramnagar Police Thane ) रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी डॉक्टरला बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अटक आरोपी डॉक्टरने ७८ नवजात बालकांची (78 Infant sale by doctor in Dombivali) खरेदी-विक्री केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. केतन सोनी ( Dr Ketan Soni arrest in Thane ) असे अटक केलेल्या डॉक्टरचे नाव आहे.

ठाणे महिला व बालविकास विभागाचे अधिकारी आणि चाईल्ड लाईन ( Child Line Thane ) या सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी अथक पाठपुराव्यानंतर डॉक्टरच्या विरोधात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला. नवजात बालकाची विक्री करणाऱ्या पती-पत्नीलाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रिया संतोष आहिरे व संतोष अहिरे या असे अटक केलेल्या पती पत्नीचे नाव आहे.

हेही वाचा-पित्याने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गर्भपात झाल्याने घटना उघडकीस

१ लाखात बाळाचा सौदा-
डोंबिवली येथील प्रिया आणि संतोष अहिरे यांच्या कुटुंबाची परिस्थिती हलाखीची आहे. प्रिया यांची डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात १० नोव्हेंबर रोजी प्रसूती झाली होती. ही महिला रुग्णालयातून घरी गेल्यावर डॉ. सोनी यांनी ज्यांना मूल नाही त्यांना तुमचे बाळ द्या, असे या पती पत्नीला सांगितले होते. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी पती व पत्नी पाच दिवसांचे बाळ घेऊन डोंबिवली पूर्वेतील गणपती मंदिराजवळ गेले. त्यावेळी आरोपी डॉ. सोनी यांनी इंग्रजीत लिहिलेल्या कागदावर दोघांच्या सह्या घेतल्या. पत्नी व पतीला १ लाख रुपये देऊन ( Husband and wife sale infant for money ) आरोपी डॉ. सोनी हे बाळाला घेऊन निघून गेले. आरोपी डॉक्टरचा कल्याण परिसरात होमीओपॅथी दवाखाना आहे.

हेही वाचा-धक्कादायक..! अमरावतीत कार्यालयातच तलाठ्याचे महिलेसोबत अश्लील चाळे, ग्रामस्थांनी दिला चोप

विक्री केलेल्या बाळाचा परत विषय काढायचा नाही..
आपले बाळ विक्री केल्याने प्रियाच्या मनाला ते पटले नाही. त्यामुळे तिने १७ नोव्हेंबरला आरोपी डॉ. सोनी यांना फोन करून बाळ परत द्या, मी तुमचे पैसे परत देते, असे सांगितले. मात्र, आता परत बाळाचा विषय काढायचा नाही, असे डॉ. सोनी यांनी त्यांना उलट सुनावले. ही बाब जोडप्याने सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौहान यांना सांगितली. डॉ. केतन सोनी यांना एक लाख बाळ रुपयाला विकल्याची तक्रार डोंबिवली येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौहान यांनी महिला व बालविकास विभागाच्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांना फोनद्वारे दिली होती. त्यानुसार डॉ. जाधव यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी महेंद्र गायकवाड व बाल कल्याण समितीने केलेल्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणाचा तपास सुरू. तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

हेही वाचा-महिला अंघोळ करताना सुरक्षारक्षक काढत होता व्हिडिओ; अन् तेवढ्यात...

सामाजिक कार्यकर्त्यांमुळे बाळ खरेदी विक्रीचे बिंग फुटले...
रामनगर पोलीस ठाण्यामध्ये बाल न्याय अधिनियम २०१५ कलम ८० व ८१ नुसार संगनमताने बाळाची विक्री केल्याबद्दल प्रिया आणि संतोष अहिरे तसेच डॉ. सोनी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या बाल संरक्षण अधिकारी डॉ. पल्लवी जाधव यांच्यासह सखी वन स्टॉप सेंटरच्या सिद्धी तेलंगे, ठाणे चाईल्ड लाईनच्या श्रद्धा नारकर व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चव्हाण सहभाग होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.