ETV Bharat / city

Bhondu Baba Arrested : करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला अटक - Bhondu Baba For financial fraud

जळगावच्या मांत्रिक भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या (Bhondu Baba For financial fraud) नावाखाली डोंबिवलीत राहणाऱ्या कुटूंबाला तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झाली होती. (Arrested Bhondu Baba ) या तक्रारीवरून मांत्रिक बाबाला रामनगर पोलिसांनी जळगावातून अटक केली आहे.

करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली गंडा घालणाऱ्या भोंदू बाबाला अटक

author img

By

Published : Jan 25, 2022, 3:59 AM IST

ठाणे - जळगावच्या मांत्रिक भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली डोंबिवलीत राहणाऱ्या कुटूंबाला तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी दाखल झाली होती. (Bhondu Baba For financial fraud) या तक्रारीवरून मांत्रिक बाबाला रामनगर पोलिसांनी जळगावातून अटक केली आहे. पवन बापुराव पाटील (वय. 28) असे अटक केलेल्या आरोपी मांत्रिकाचे नाव आहे.

पीडित महिलांची अशी केली फसवणूक

जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा-शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक मांत्रिकाने (डिसेंबर 2019)पासून आजतागायत तक्रारदार प्रियांका राणे यांच्यासह डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला असलेल्या ओम साई सोसायटीत राहणाऱ्या आईची फसवणूक केली. प्रियांका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला त्याच्या अंगात इच्छामाता सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकु व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच, या बाबाने कुणीतरी करणी केल्याची भीती घातली.

पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर

करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने आपल्या व आईचे खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये 31 लाख 6 हजार 874 रूपये इतके पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले. तसेच, आपल्याकडून 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे या पवन पाटील याने 32 लाख 15 हजार 874 रुपयांची फसवणूक करून आमचा विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका राणे करीत पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि कलम 420, 406, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (ख), 3 (1), (2) अन्वये दोन दिवसापूर्वी गुन्हा दाखल करून आरोपी मांत्रिकाचा शोध सुरू केला होता.

दोन दिवसाची पोलीस कोठडी

करणी, भूत-प्रेतबाधा काढण्याच्या नावाखाली इतका पैसा उकळणारा हा भोंदूबाबा आहे तरी कोण ? त्याने इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गंडा घालण्याचे धाडस कसे केले ? अशाप्रकारे आणखी कित्ती अंधश्रद्धाळुंना या बाबाने गंडा घातला ? आदी प्रश्नांची उकल त्याच्या चौकशीनंतर होणार आहे. तर मांत्रिक भोंदू बाबाला कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असत त्याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश सरडे अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा - Poonam Mahajan Twitter : 'दोन्ही मर्दानी हिंदुत्वसाठी युती केली होती'! पुनम महाजन यांचे ट्विट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.