ETV Bharat / city

Thane Crime कुजलेल्या मृतदेहाच्या हातावर गोंदलेल्या नावावरून पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

उल्हासनगरमधील दसरा मैदान नजीकच्या नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून decomposed body found ulhasnagar thane आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून हातावर गोंदलेल्या नावावरून हिललाईन पोलिसांना Hillline Police Station Thane आरोपींचा शोध घेऊन एकाला बेड्या ठोकण्यात यश Thane Police arrested accused on basis of name tattooed आले आहे. किशन थापा असे आरोपीचे नाव असून या गुन्ह्यातील दुसरा आरोपी समीर थापा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.

author img

By

Published : Aug 29, 2022, 8:18 PM IST

Thane police arresting the accused in the Deepak Bhat murder case and taking them away
ठाणे पोलीस दिपक भट हत्याकांडातील आरोपीला अटक करून घेऊन जाताना

ठाणे उल्हासनगरमधील दसरा मैदान नजीकच्या नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून decomposed body found ulhasnagar thane आलेल्या मृतदेहाची ओळख पटवून हातावर गोंदलेल्या नावावरून हिललाईन पोलिसांना Hillline Police Station Thane आरोपींचा शोध घेऊन एकाला बेड्या ठोकण्यात यश Thane Police arrested accused on basis of name tattooed आले आहे. किशन थापा असे आरोपीचे नाव असून या गुन्ह्यातील दुसरा आरोपी समीर थापा हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. तर दीपक राजेंद्र भट वय २१ वर्षे असे निर्घृण हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो मूळचा नेपाळचा राहणारा होता.

ठाण्याचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते गुन्हेगारांचे कृत्य उकलताना

हातावरील नावाच्या टॅटूवरून पटविली मृताची ओळख उल्हासनगर मधील दसरा मैदान नजीकच्या मोठ्या नाल्यात २४ ऑगस्ट रोजी अनोखळी तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यावेळी पोलिसांनी घाटनास्थळी पंचनामा करत मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात रवाना करून हिललाईन पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद गुन्हे शाखेचे तपास पोलीस निरीक्षक करडकर यांच्यासह पथकाने सुरू केला. मात्र मृतदेहाचा चेहऱ्यावरील संपूर्ण त्वचा कुजलेली असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे तसेच मृत्यूचे कारण समजणे पोलीसांसाठी आव्हान होते. त्यातच मृतदेहाच्या उजव्या हातावर इंग्रजीत Deepak असे नाव गोंदलेले दिसून आले. त्यावरून मृतदेहाची ओळख पटविणेसाठी स्वतंत्र पोलीस पथके नेमण्यात आली होती. एका पथकातील पोलीस हवालदार अहिरे, आणि जाधव हे तपास करत असताना मृत व्यक्ती हा दिपक भट नावाचा नेपाळी इसम असून तो गायकवाड पाडा, उल्हासनगर कँम्प नंबर ५ येथील सनी चायनीज सेंटरमध्ये चायनीज बनविण्याचे काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली. या माहितीवरून मृत तरुणाचा काम करीत असलेल्या ठिकाण शोधून त्याचे बदलापूरला राहणारा नातेवाईक टिका सुकदेव भट, यांचा शोध घेतला व त्यांना मृताच्या उजव्या हातावर इंग्रजीत DeePak गोंदलला फोटो दाखविला असता त्यांनी ते पाहून मयताचे नाव दिपक राजेंद्र भट असे असल्याचे निष्पन्न झाले.

फावड्याच्या दांड्याने वार करत संपविले मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अधिक तपास केला असता मृत दिपक सोबतचे त्याचे मूळ गावाकडील इतर चार साथीदार यांच्यात १७ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास दारू पिऊन शिवीगाळ केल्याने वाद झाला. याच वादातून आरोपी किशन थापा आणि समीर थापा यांनी मृत दिपकला फावडयाच्या दांडक्याने डोक्याचे मागे, पाठीवर बेदम मारहाण करून लाकडाचा ठोकळा त्याच्या कपाळावर व चेहऱ्यावर मारून त्याला जागीच जीवे ठार मारले. त्यानंतर त्याचा मृतदेह दसरा मैदान जवळील नाल्यात फेकुन दिल्याचे पोलीस तपासात तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात २८ ऑगस्ट रोजी भादंवि. कलम ३०२,२०१, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येऊन गुन्हयातील आरोपी कालु उर्फ कृष्णा उर्फ किशन थापा याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली आहे. तर दुसरा आरोपी समीर थापा याचा शोध पोलीस पथक घेत असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली.

हेही वाचा Soldier Killed Girlfriend Son सैन्यात जवान असलेल्या प्रियकराकडून प्रेयसीच्या मुलाची हत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.