ETV Bharat / city

सशस्त्र दरोड्याचा प्लॅन पोलिसांनी उधळला; तलवारी, चॉपर, कोयत्यासह 5 दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

लक्ष्मीनारायण कंपाऊंडमधील कपड्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोर रोहित झा व त्याचे साथीदार सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस नाईक मिलिंद बोरसे यांना खबऱ्याकडून मिळली होती. त्यावरुन पोलिसांनी या २ कुख्यात दरोडेखोरांसह ५ जणांच्या मुसक्या आवळल्या.

Thane
पोलिसांनी अटक केलेले दरोडेखोर
author img

By

Published : Jun 12, 2020, 8:26 PM IST

ठाणे - कपड्याच्या कारखान्यात तलवार-चॉपर-कोयता घेऊन दरोडा टाकण्याचा 5 जणांचा प्लॅन उल्हासनगर पोलिसांनी उधळून लावला. या सराईत दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना उल्हासनगर कॅम्प नंबर 2 स्मशानभूमी जवळ असलेल्या लक्ष्मीनारायण कंपाऊंडमधील कपड्याच्या कारखान्यात घडली आहे. रोहीत झा, विजय उर्फ नन्हे राय, आकाश काते, उमेश जाधव, अभिनंदन तिवारी अशी दरोडेखोरांची नावे असून यापैकी रोहित झा व नन्हे राय हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

सशस्त्र दरोड्याचा प्लॅन पोलिसांनी उधळला; तलवारी, चॉपर, कोयत्यासह 5 दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर कॅम्प नंबर 2 स्मशानभूमी जवळ असलेल्या लक्ष्मीनारायण कंपाऊंडमधील कपड्याचा कारखाना आहे. या कारखान्यात गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोर रोहीत झा व त्याचे साथीदार सशस्त्र दरोडा टाकण्यासाठी येत असल्याची माहिती पोलीस नाईक मिलिंद बोरसे यांना खबऱ्याकडून मिळली होती. त्यावरुन त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम, पोलीस निरीक्षक संतोष गोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र चौधरी, उपनिरीक्षक योगेश माळी असे पथक तैनात करण्यात आली.

कारखान्याच्या गेटच्या आजूबाजूला दबा धरून सापळा रचण्यात आला. पाचजण मेन गेटकडे जात असल्याचे बघताच दरोडेखोर पळून जाता कामा नये, याची खबरदारी घेऊन लपून बसलेल्या अधिकारी व पोलिसांनी चोहो बाजुंनी घेराव घालून त्यांच्यावर झडप घातली. त्यांची झडती घेण्यात आली असता, त्यांच्याकडे चक्क 4 तलवारी, 2 चॉपर, कोयता, हातोडा या घातक शस्रसाठ्यांसह दोरखंड, मिरचीपूड मिळून आले. त्यांनी दरोडा टाकण्यासाठी आलो होतो, अशी कबुली दिली आहे.

पोलिसांनी रोहित झा, विजय उर्फ नन्हे राय, आकाश काते, उमेश जाधव, अभिनंदन तिवारी या दरोडेखोरांना अटक करून आज न्यायालयात हजर केले. यावेळी न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन शिंदे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.