ठाणे ठाण्यातील आझाद नगरमध्ये राहणाऱ्या शिवम पांडे accused Shivam Pande याला कापूरबावडी पोलिसांनी Kapurbawadi Police station अटक केली आहे. पांडे यांनी चक्क ठाणे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची खोटी सही Fake signature of Thane Police Commissioner करून सुरक्षा रक्षक कंपनीचे प्रमाणपत्र बनवले आहे. Thane Police Commissioner fake signature certificate
पोलीस आयुक्तांच्या बनावटी स्वाक्षरीचे प्रमाणपत्र बनविण्यापर्यंत मजल खोटी कागदपत्र तयार करणारे काय करू शकतात याचा नेम नाही. ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची सही करून खोटे प्रमाणपत्र तयार केले आहे. 27 फेब्रुवारी 2022 ते 26 फेब्रुवारी 2027 पर्यंतच्या काळाचे हे खोटे प्रमाणपत्र असून शिंवम पांडे याने सुरक्षा रक्षक कंपनीचा व्यवसाय थाटला होता. कापूरबावडी पोलिसांना मिळलेल्या माहितीनुसार त्यांनी कारवाई करून आरोपी शिवम याला अटक केली. चक्क पोलीस आयुक्तांच्या बनावटी स्वाक्षरीचे प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे. आज शिवम याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याने अशा प्रकारे आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा शोध ठाणे पोलीस करत आहेत.
हेही वाचा Mumbai Crime सराईत चोराला मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद