ETV Bharat / city

रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आहाराकडे लोकांचा कल - ठाणे लेटेस्ट

लॉकडाऊन मध्ये वाढलेले वजन कमी करण्यासोबत डायट वर लक्ष देण्याचा ट्रेन्ड वाढला आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये बेकिंग आणि कुकिंगचा ट्रेण्ड होता, प्रत्येकजण नवनवीन पदार्थ बनवून खात होता. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोक डाएटविषयी अधिक सजग होताना दिसत आहेत.

आहारावर लक्ष देण्याकडे लोकांचा कल
आहारावर लक्ष देण्याकडे लोकांचा कल
author img

By

Published : May 5, 2021, 7:11 AM IST

Updated : May 5, 2021, 7:51 AM IST

ठाणे - वाढत्या कोरोनाशी दोन हाथ करण्यासाठी असा आहार पाहिजे, की त्यातून मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्व मिळतील. आहाराच्या सल्ल्यासाठी अनेक लोकांनी आहारतज्ज्ञांकडे धाव घेण्यास सुरूवात केली आहे. यामध्ये पोस्ट कोविड डाएड घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच वजन कमी करण्याच्या डाएटपेक्षा रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या डाएटकडे लोकांचा कल वाढला आहे. यामुळे अनेकजण मूळ भारतीय आहाराकडे वळत असल्याने त्याबाबत जनजागृती होत असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले.

रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या आहाराकडे लोकांचा कल

पहिल्या लाटेत बेकिंग आणि कुकिंगचा ट्रेण्ड

पहिल्या लॉकडाऊनमध्ये बेकिंग आणि कुकिंगचा ट्रेण्ड होता. जो तो नवनवीन पदार्थ बनवून खात होता. त्याचे दुष्परिणाम म्हणजे वजन वाढत गेले. पहिल्या लॉकडाऊनमध्ये डाएट हा विषयच पूर्ण बाजूला राहिला होता. डाएट केल्याने वजन कमी होऊन प्रतिकारशक्ती कमी होईल आणि कोरोना होईल हा गैरसमज होता.

'दुसऱ्या लाटेत निरोगी आहारशैलीकडे कल'

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ठाणेकर डाएटविषयी अधिक सजग होताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी चांगल्या आहाराच्या सल्ल्यासाठी आहारतज्ज्ञांकडे धाव घेण्यास सुरू केली आहे. दुसऱ्या लाटेत लोकांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसत आहे, असे प्रसिद्ध आहारतज्ज्ञ डॉ. दीपाली आठवले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, ज्यांना आधीपासूनच रक्तदाब, मधुमेह, थायरॉइड आहे आणि कोरोना झाला तर आणखीन त्रास अशी भीती ज्यांना वाटत आहे, ते लोक निरोगी आहारशैलीकडे वळत आहेत.

पोस्ट कोविड डाएड घेणाऱ्यांची संख्या अधिक

कोरोनातून बरा झालेला माणूस आतून हादरला आहे. श्वास घ्यायला त्रास होणे, वजन वाढणे, औषधांचे साइड इफेक्ट्स यातून बाहेर येण्यासाठी तो डाएटचा आधार घेत आहे. यामध्ये पोस्ट कोविड डाएड घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच वजन कमी करण्याच्या डाएटपेक्षा रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या डाएटकडे लोकांचा कल वाढला आहे. यामुळे अनेकजण मूळ भारतीय आहाराकडे वळत असल्याने त्याबाबत जनजागृती होत असल्याचे आहारतज्ज्ञांनी सांगितले. पोस्ट कोविड डाएट घेणारे आणि त्यातही ऑनलाइन सल्ला घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे, दुसऱ्या लाटेनंतर आहाराच्या सल्ल्यासाठी येणाऱ्यांची संख्या २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. डाएटकडे ३५ ते ५० वर्षे वयोगटातील वर्ग वळत आहे.

'आहारावर भर देऊन वजनाची काळजी सुरू'

पहिल्या लॉकडाऊनमध्ये नवनवीन पदार्थ बनविले जात होते. त्यामुळे आमचे वजन वाढत गेले. कोरोनामुळे डाएट आणि व्यायामाचे महत्त्व पटल्यामुळे आम्ही दोघे डाएट करीत आहोत. तसेच जिमचीही कपल मेम्बरशिप घेतली आहे. पहिले आम्ही वजन कमी करण्यासाठी, मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेत होतो. परंतु, आता आम्ही कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आमची नैसर्गिक रोग प्रतिकारशक्ती कशी वाढेल, याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून घेत आहोत. असे आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणारे सांगत आहेत.

'जीवनसत्व गोळ्या ऐवजी नैसर्गिक आहारावर भर द्या'

'क' जीवनसत्त्व मिळविण्यासाठी व्हिटॅमिन सीच्या गोळ्यांचा नुसता भडिमार सुरू आहे. पण सध्याच्या काळात आंबा हे सर्वाधिक 'क' जीवनसत्त्व देणारे फळ आहे. त्याचबरोबर लिंबू, कैरीचे पन्हे, कोकम सरबत, आवळाही खाऊ शकता, असा सल्लाही डॉ. आठवले यांनी दिला आहे.

हेही वाचा - मुंबईत लस साठा आला.. आजपासून लसीकरण सुरू, नोंदणी करून जा लसीकरणाला

Last Updated : May 5, 2021, 7:51 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.