ठाणे - राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता दहीहंडीला राज्य सरकारने परवानगी नाकारली आहे. मात्र, असे असतानाच कृष्ण जन्माष्टमीनिमित्त कल्याणमधील चार व्यावसायिकांनी सोमवारी कल्याण पश्चिमेकडील सॉलिटर बेंक्विट हॉलमध्ये संगीत कार्यक्रम आयोजित केल्याचा प्रकार समोर आला आहे. या कार्यक्रमाला प्रसिद्ध गायिका फाल्गुनी पाठक उपस्थित होत्या. कार्यक्रमाला कोरोनाचे नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे दिसत आहे. दरम्यान, या कार्यक्रमाचा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोरोनाचे नियम पायदळी
सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली तरीही तिसऱ्या लाटेचा धोका आजही कायम आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून सरकारने लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता नागरिकांना मास्क वापरणे, फिजिकल डिस्टन्सिंग ठेवणे, अनावश्यक गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, त्यानंतर देखील नागरिकांकडून सुरू असलेली बेजबाबदारपणा पाहता ही धोक्याची घंटा ठरू शकते. आता पोलीस प्रशासन झालेल्या प्रकरणावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - महाराष्ट्रात राजकीय काला : दहीहंडी, आगामी सणांवरुन राज्य सरकार-विरोधक संघर्ष पेटणार?