ETV Bharat / city

ठाण्यात जीवनावश्यक वस्तूंबाबत लॉकडाऊन आदेशात माहिती नाही; नागरिकांमध्ये संभ्रम - ठाण्यात लॉकडाऊनमुळे नागरिक संभ्रमात

ठाणे महापालिकेकडून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता घरकाम करणाऱ्यांना यामध्ये मुभा देण्यात आली आहे, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून देखील कारवाई होत आहे. जीवनावश्यक वस्तू सुरू करण्यासंदर्भात महापालिकेकडून तसे लेखी आदेश न दिल्यामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ भाजीमंडई व किराणा स्टोअर बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

thane
बंद असलेली भाजीमंडई
author img

By

Published : Jul 11, 2020, 7:36 PM IST

Updated : Jul 11, 2020, 11:55 PM IST

ठाणे - शहरात 2 जुलैला जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सुरुवातीला मोठा गोंधळ निर्माण झाला होता. आता हा लॉकडाऊन पुन्हा एकदा 19 जुलैपर्यंत वाढवला आहे. त्यासाठी काय नियम असतील, याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे.

ठाण्यात जीवनावश्यक वस्तूंबाबत लॉकडाऊन आदेशात माहिती नाही; नागरिकांमध्ये संभ्रम

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता ठाणे महापालिकेकडून पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. 19 जुलैला सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या अगोदर 2 जुलै ते 12 जुलैपर्यंत हा लॉकडाऊन होता. आता हा लॉकडाऊन 8 दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता घरकाम करणाऱ्यांना यामध्ये मुभा देण्यात आली आहे, तर विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून देखील कारवाई होत आहे.

या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू करण्यासंदर्भात पालिकेकडून तसे लेखी आदेश न दिल्यामुळे ठाण्यातील मुख्य बाजारपेठ, भाजीमंडई व किराणा स्टोअर बंद ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे ग्राहकांसह व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. व्यापाऱ्यांनी आणलेला लाखो रुपयांचा भाजीपाला आणि सामानाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे महापालिकेने लेखी आदेश द्यावे, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Last Updated : Jul 11, 2020, 11:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.