ETV Bharat / city

Ukraine Russia War : ठाण्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनबाहेर, पालकांची चिंता कायम

युक्रेन आणि रशियात सुरू असलेल्या युद्धात ( Ukraine Russia War ) तिथे शिक्षणासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. हजारो विद्यार्थी किलोमीटरचा पायी प्रवास करत रोमानिया आणि पोलंड देशांच्या सीमेवर पोहोचत असून तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांना भारत सरकारकडून मदत केली जात आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला लव शर्मा ठाण्यातील युवकही त्यापैकीच एक आहे. लहू आता परतीच्या मार्गावर असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

author img

By

Published : Mar 2, 2022, 7:52 PM IST

छायाचित्र
छायाचित्र

ठाणे - युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू आहे. ( Ukraine Russia War ) युक्रेन येथे शिक्षणासाठी गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत असून बाहेर पडण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. हजारो विद्यार्थी किलोमीटरचा पायी प्रवास करत रोमानिया आणि पोलंड देशांच्या सीमेवर पोहोचत असून तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांना भारत सरकारकडून मदत केली जात आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला लव शर्मा ठाण्यातील युवकही त्यापैकीच एक आहे. लहू आता परतीच्या मार्गावर असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठाण्यातील अनेक विद्यार्थी युक्रेनबाहेर

मागील तीन वर्षे युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या ठाण्यातील लव शर्मा हा युवक महत्त्वाची परीक्षा असल्याने 23 व 24 फेब्रुवारीला तिकिट असतानाही तो येऊ शकला नाही. युद्धाचा भडका उडाल्यानंतर पायी प्रवास करत लव शर्मा हा सीमेवर आला. पण, अतिशय थंड वातावरणात अन्न पाण्याच्या कमतरतेमुळे त्यांना प्रचंड हाल सोसावे लागले. पण, लव आता परतीच्या मार्गावर असल्याने त्याच्या आई वडिलांनी समाधान व्यक्त केले आहे.

तासंतास पायपीट करून करावा लागला प्रवास - तर लव शर्मा आणि त्याच्यासह असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दहा ते पंधरा तासांची पायपीट करत युक्रेनची सीमा ओलांडली. त्यानंतर तो आता परतीच्या प्रवासाला लागला आहे. पण, या तीन दिवसांत त्याला प्रचंड थंडी आणि अन्न, पाण्याच्या कमतरतेला तोंड द्यावे लागले. त्यातच सीमेवर प्रचंड गर्दी केल्याने रोमेनिया आणि पोलंडच्या सीमांवर गोळीबार आणि विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याने सगळे धास्तावले होते. पण, लव आता लवकरच भारतात येईल, अशी आशा निर्माण झाल्याने सर्व समाधान व्यक्त करत आहेत.

हेही वाचा - Russia Ukraine Crisis : आम्ही स्वतःला जमिनीखाली ठेवलंय, लवकरात लवकर आम्हाला बाहेर काढा.. ठाण्यातील विद्यार्थिनीची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.