नवी मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची कमी सर्वत्र भसत आहे. त्याच अनुषंगाने राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा म्हणून 10 दिवसापूर्वी कळंबोळी रेल्वे स्थानकात ऑक्सिजन रेल विशाखा पट्टणम येथून दाखल झाली होती. सद्यस्थितीत ही रेल्वे गुजरातच्या जामनगर येथून कळंबोली स्थानकात आज दाखल झाली. यातील 2 टँकर मुंबईसाठी तर 1 टँकर पुण्यासाठी असणार आहे.
हाफा जामगर मधून रविवारी रेल्वे ऑक्सिजन टँकर निघाले -
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भासत असलेला ऑक्सिजनचा तुटवडा त्याच अनुषंगाने हाफा जामनगर येथुल रविवारी संध्याकाळी तीन ऑक्सिजन टँकर रेल्वेच्या माध्यमातून निघाले होते. आज कळंबोली रेल्वे स्थानकावर पोहचले असून, प्रत्येक टँकमध्ये 15 मेट्रीक टन ऑक्सिजन आहेत.
दोन टँकर मुंबईसाठी व 2 टॅंकर पुण्यासाठी होणार रवाना -
गुजरात जामगर येथून कळंबोली रेल्वे स्थानकात आलेला ऑक्सिजन टँकर हा एक टँकर पुणे व 2 टँकर मुंबईसाठी असणार आहेत.