ETV Bharat / city

Outbreak of Dengue Malaria in Thane : ठाण्यात डेंग्यूचे 3 तर मलेरियाचे 28 रुग्ण, कोरोना पाठोपाठ संसर्गजन्य रोगाचा वाढता प्रादुर्भाव - Malaria

कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच डेंग्यू आणि मलेरियाचेही रुग्ण ठाणे जिल्ह्यात वाढत आहेत. मे महिन्यात डेंग्यूचे संशयित रुग्ण दहा तर निदान झालेले तीन रुग्ण होते. मलेरियाचे 28 रुग्ण आढळले. कोरोनासह साथीच्या आजाराचे प्रमाण वाढल्याने पालिका प्रशासनाला आता विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.

ठाणे मनपात रुग्णवाढ
ठाणे मनपात रुग्णवाढ
author img

By

Published : Jun 8, 2022, 9:33 AM IST

ठाणे : ठाणे ( Thane ) जिल्ह्यात कोरोना रुग्णाची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे संसर्गजन्य रोगाचा देखील प्रसार होत आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये मे 2022 मध्ये डेंग्यूचे ( Dengue ) संशयित रुग्णसंख्या 10 आणि निश्चित निदान झालेले एकूण 03 रुग्ण होते. तर मलेरियाचे ( Malaria ) 28 रुग्ण आढळून आले. चिकनगुनियाची संशयित रुग्णसंख्या 1 असून निश्चित निदान केलेली रुग्णसंख्या शून्य असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे. वाढत्या संसर्गजन्य रोगामुळे पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाचे धाबे दणाणले आहे.

आरोग्य विभाग कामाला - ठाणे जिल्ह्यासह पालिकेचा आरोग्य विभाग कामाला लागला आहे. यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी घरोघरी भेट देत आतापर्यंत एकूण 24747 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 377 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 35793 कंटेनरची तपासणी केली असता 432 कंटेनर दूषित आढळून आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या अनुषंगाने दरम्यानच्या कालावधीत कार्यक्षेत्रात 50 हॅण्डपंप, ट्रॅक्टर्स-10, ई रिक्षा 6, 10 बोलेरो वाहनांमार्फत दोन सत्रात 1729 ठिकाणी औषध फवारणी आणि हॅण्डमशीनद्वारे 10758 ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे. 9 ठिकाणी गप्पी मासे सोडण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले असल्याचे उपवैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. स्मिताली हुमरसकर यांनी सांगितले आहे.

उपाय योजना सुरू - कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि पालिका प्रशासन समन्वय साधून बूस्टर डोस देण्यावर भर देण्यात आला आहे. त्यासोबत साथीचे आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य केंद्रावर औषधोपचार करण्यावर भर दिला आहे. त्यासोबत धूर फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. साफसफाईवर पालिकेने विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याशिवाय रस्ते साफसफाई आणि नाले सफाई वर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

हेही वाचा -दिल्ली मुंबईसह गुजरातमध्ये अल-कायदाची आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.