ठाणे - भीमा कोरेगाव प्रकरणी पुन्हा चौकशी करण्याचे राज्य सरकार प्रयत्न करत आहे. त्याबाबत प्रविण दरेकर यांना विचारले असता, त्यांनी या प्रकरणाचा पुन्हा तपास करणे म्हणजे पोलिस यंत्रणेवर अविश्वास दाखवणे आणि त्यांचे खच्चीकरण करणे होय, असे मत व्यक्त केले.
हेही वाचा... 'शरद पवारांची काळजी घेणे आपलं काम'; बाळासाहेब थोरातांची नाराजी
पुर्वाश्रमीचे मनसेचे आमदार असलेले प्रविण दरेकर यांनी मनसेने झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा केलेला वापराबाबत राज ठाकरे यांचे समर्थन केले. दरेकर यांना मनसेने झेंड्यावर राजमुद्रेचा केलेला वापर याबाबत विचारले असता, त्यांनी त्यात काही गैर नसल्याचे म्हटले आहे. तसेच राज ठाकरे यांनी झेंडा निवडणूक काळात वापरणार नसल्याचे म्हटले असल्याने, यात आक्षेप घेण्यासारखे नसल्याचेही म्हटले आहे.
हेही वाचा.... एक रात्र भूतांसोबत... अंनिसचा अभिनव प्रयोग
सरकारच्या धोरणावर दरेकरांची टीका...
आमच्या सरकारचे सर्व निर्णय चुकीचे ठरवण्याचे दुर्दैवी काम सध्याचे विद्यामान सरकार करत असल्याची टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे. तसेच CAA आणि NRC च्या विरोधात जेवढे मोर्चे निघत आहेत, त्यापेक्षा जास्त मोर्चे जनतेने या कायद्यांच्या समर्थनार्थ काढले आहेत आणि या निर्णयाचे स्वागत केले आहे, असेही दरेकर यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांनी CAA आणि NRC बाबत मोदींना दिलेल्या पाठिंब्याचे स्वागत केले.
हेही वाचा... जयपूर साहित्य संमेलनात शशी थरूर यांची चौफेर फटकेबाजी; आरएसएसलाही केले लक्ष्य
सरकारने कोकणातील जनतेच्या तोंडाला पाने पुसली - दरेकर
कोकणातील मतदारांनी शिवसेनेला नेहमी मते दिली. मात्र, आता कोकणाला काही पॅकेज द्यायचे म्हटले, की शिवसेना हात आखडता घेते. हे दुर्दैव असल्याचे प्रविण दरेकर यांनी म्हटले.