ETV Bharat / city

ठाण्यात घंटागाडीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार ठार

ठाणे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या घंटागाडीचा एका दुचाकीला धक्का लागला. यामुळे दुचाकीस्वार घसरून घंटागाडीच्या मागच्या चाकाखाली आला. या अपघातात दुचाकीस्वाराचा चिरडल्याने जागीच मृत्यू झाला.

Two wheeler driver died in Thane
दुचाकीस्वाराचा मृत्यू ठाणे
author img

By

Published : Feb 15, 2020, 5:38 AM IST

ठाणे - घंटागाडीची धडक बसून दुचाकीस्वार मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी ठाण्यात घडली. अनिल देहेरकर (53 रा.माजिवडा, गोल्डन पार्क) असे मृत्यूमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी गुन्हा दाखल करून घंटागाडी चालक मोहन मंडल (41) याला अटक केली आहे.

two wheeler accident in thane
ठाण्यात घंटागाडीच्या चाकाखाली आल्याने दुचाकीस्वार ठार

हेही वाचा... व्हॅलेन्टाईन डे'ला दिल्ली विमानतळ इंडिगोच्या प्रेमात; गमतीशीर ट्विट्ने उडविली धमाल

ठाणे पश्चिमेकडील माजीवडा परिसरातील गोल्डन पार्क सोसायटीत अनिल देहरकर हे पत्नी व मुलासह राहतात. अनिल हे वागळे इस्टेट (अंबिकानगर) येथे नोकरी निमित्त दररोज दुचाकीने ये-जा करत असतात. शुक्रवारी दुपारच्या सुमारास कामावर जात असताना कामगार रुग्णालयातील चौकात ते आले. त्यावेळी ठाणे महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या घंटागाडीचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला. यामुळे दुचाकीवरून घसरून ते थेट घंटागाडीच्या मागच्या चाकाखाली आले. या अपघातात त्यांचा चिरडल्याने जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घंटागाडी चालक मंडल याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.