नवी मुंबई : नवी मुंबईतील कामोठे कॉलनीत जीर्ण इमारत पाडताना झालेल्या अपघातात पोकलेन चालकाचा मृत्यू झाला. कामोठे कॉलनीतील सेक्टर 35 मधील ब्लू हेवन ही इमारत राहण्यासाठी असुरक्षित ( Blue Haven is unsafe building to live ) घोषित करण्यात आली होती.
पालिकेने नोटीस दिल्यानंतर विकासकाकडून ही इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम सुरू असताना सायंकाळी झालेल्या अपघातात पोकलेन चालकाला आपला जीव गमवावा लागला आहे. याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलीस तपास करत आहेत.