ETV Bharat / city

Omicron MH update : ओमायक्रोनचे 8 नवीन रुग्ण; दुसऱ्या लाटेतील कोरोनाचे आढळले 902 रुग्ण

author img

By

Published : Dec 17, 2021, 9:32 PM IST

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटांचा मुकाबला केल्यानंतर जनजीवन पूर्ववत होत असतानाच ओमायक्रोनचे संकट ( Omicron threat in Maharashtra ) घोंघावत आहे. गुरुवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत दिलासा व्यक्त केला. मात्र आज 8 नवीन रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची ( New 8 omicron cases in Maharashtra ) डोकेदुखी वाढली आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट

मुंबई - राज्यात ओमायक्रोनचा संसर्ग वाढत ( Omicron spread in Maharashtra ) आहे. राष्ट्रीय विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार दिवसभरात ओमायक्रॉनचे 8 नवीन रुग्ण आढळून ( 8 new Omicron cases in Maharashtra ) आले. यापैकी 6 पुणे येथील तर उर्वरित दोन रुग्ण मुंबई आणि कल्याण-डोंबिवली येथील आहेत. दुसऱ्या लाटेतील कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दिवसभरात 902 नवीन रुग्ण ( New corona cases in 902 in MH ) आढळले आहेत. केडीएमसी क्षेत्रातील दुसऱ्या ओमायक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज

आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटांचा मुकाबला केल्यानंतर जनजीवन पूर्ववत होत असतानाच ओमायक्रोनचे संकट ( Omicron threat in Maharashtra ) घोंघावत आहे. गुरुवारी ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळून आलेला नव्हता. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबत दिलासा व्यक्त केला. मात्र आज 8 नवीन रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाची ( New 8 omicron cases in Maharashtra ) डोकेदुखी वाढली आहे. सात रुग्णांमध्ये लक्षणेविरहित तर एकामध्ये सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. पैकी 4 जणांचा दुबई, 2 निकटवर्तीय, 1 अमेरिका, 1 नाजेरियात प्रवास केला आहे. हे सर्व रुग्ण पुरुष असून मुंबई, पुणे, कल्याण - डोंबिवली भागातील आहेत. दोघांना रुग्णालयात तर सहा जणांना घरी विलगिकरणात ठेवण्यात आल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

हेही वाचा-Omicron In Pune : पुण्याच्या ग्रामीण भागात ओमायक्रॉनची एंट्री; दुबईहून परतलेल्या ७ जणांना लागण

येथे सापडले ओमायक्रोनचे रुग्ण

मुंबईत 14, पिंपरी चिंचवड 10, पुणे ग्रामीण 6, पुणे मनपा 2, उस्मानाबाद, कल्याण डोंबिवली मध्ये 2, नागपूर, लातूर, वसई - विरार, बुलढाणा प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. त्यामुळे आजपर्यंतच्या रुग्णांची 40 झाली आहे. पैकी 25 जणांची आरटीपीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडून देण्यात आले आहे.

हेही वाचा-State Human Rights Commission : राज्य मानवी हक्क आयोगात अध्यक्षांसह दोन सदस्यांची होणार नियुक्ती

525 प्रवाशांची जनुकीय चाचणी
1 डिसेंबरपासून आजपर्यंत 1,14,446 प्रवासी मुंबई, नागपूर आणि पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. एकूण 19 हजार 165 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 45 आणि इतर देशातील 16 अशा एकूण 61 तर आजपर्यंतच्या 525 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 79 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

हेही वाचा-Department Funds Allocation : मुख्यमंत्री शिवसेनचा, मात्र सर्वाधिक निधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यांना

6903 रुग्ण ऍक्टिव्ह
राज्यात आज दिवसभरात 902 नवीन रुग्ण सापडले. कोरोनाग्रस्तांचा आकडा यामुळे 66 लाख 47 हजार 840 वर पोहोचला आहे. तर आज 680 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 64 लाख 95 हजार 929 कोरोना बाधित उपचारानंतर बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा सरासरी दर स्थित स्थावर म्हणजेच 97.71 टक्के इतका आहे. तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आज दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. तर कोरोना बाधित रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 6 कोटी 74 लाख 41 हजार 806 चाचण्या करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांपैकी 09.86 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 79 हजार 556 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये आहे. तर आतापर्यंत 6 हजार 903 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. पैकी 12 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली. Body:

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

मुंबई महापालिका - 289
ठाणे - 13
ठाणे मनपा - 46
नवी मुंबई पालिका - 55
कल्याण डोबिवली पालिका - 17
वसई विरार पालिका - 12
नाशिक - 19
नाशिक पालिका - 26
अहमदनगर - 38
अहमदनगर पालिका - 7
पुणे - 83
पुणे पालिका - 73
पिंपरी चिंचवड पालिका - 52

दिलासादायक ! केडीएमसी क्षेत्रातील दुसऱ्या ओमायक्रॉन रुग्णाला डिस्चार्ज

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील दुसऱ्या ओमायक्रॉन रुग्णाला उपचाराअंती कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे महापालिका विलगीकरण कक्षातून त्या रुग्णाला आज डिस्चार्ज देण्यात ( discharge to Omicron patient in KDMC ) आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

नायजेरियातून आले होते कुटूंब ..
महापालिका लसीकरणासाठी करत असलेल्या सर्व्हेक्षणात 4 जणांचे 1 कुटुंब नायजेरियातून आल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागास मिळाली होती. त्यानंतर 2 डिसेंबर रोजी या चारही जणांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. 3 डिसेंबर रोजी चारही जण आरटीपीसीआर पॉझिटीव्ह आढळून आले. या कुटूंबापैकी पती-पत्नी दोघांचेही कोविड लसीकरणाचे दोनही डोसेस झालेले आहेत. उर्वरित दोघांपैकी एक दहा वर्षाचा मुलगा व एक 6 वर्षाची मुलगी आहे. या कुटूंबास महानगरपालिकेच्या कल्याण पश्चिम येथील विलगीकरण कक्षात ३ डिसेंबर रोजी दाखल करण्यात येवून त्यांचे सॅम्पल जिनोम सिक्वेंसिंगसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 45 वर्षीय पुरुषाचा चाचणी अहवाल ओमायक्रॉन पॉझिटीव्ह आला होता. या रुग्णाला आज घरी सोडण्यात आले आहे.

4 निकट सहवासीयांची आरटीपीसीआर पॉझिटिव्ह ...
या कुटुंबातील चारही व्यक्तींचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल, विलगीकरण कक्षातील उपचाराअंती निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना आज दुपारी महापालिकेच्या विलगीकरण कक्षातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या कुटुंबाचे 24 हाय रिस्क कॉन्टॅक्ट व 62 लो रिस्क कॉन्टॅक्ट अशा 86 लोकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले असता त्यातील 4 निकट सहवासीत आरटीपीसीआर पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांना महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारची लक्षणे नाहीत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. तरी नागरिकांनी घाबरुन न जाता कोविड अनुरुप वर्तनाचा कटाक्षाने अवलंब करावा, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.