ठाणे - 22 प्रवाशांना घेऊन निघालेलं तारा एअरलाइन्सचे विमान बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. नेपाळमधून हे विमान प्रवाशांना घेऊन झेपावलं होते. त्यामध्ये चार भारतीय नागरिक होते. हे चारही भारतीय नागरिक ठाणे जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती मिळत ( Nepal Plane Crash Thane Couple Their Two Kids ) आहे. दरम्यान, आता या विमानाचे अवशेष सापडल्याचे ( Nepal Plane Crash ) सांगण्यात येत आहे.
-
Nepal Army locates the crash site of Tara Air aircraft at Sanosware, Thasang-2, Mustang
— ANI (@ANI) May 30, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The aircraft with 22 people including four Indians onboard went missing yesterday. pic.twitter.com/Gn920jfphk
">Nepal Army locates the crash site of Tara Air aircraft at Sanosware, Thasang-2, Mustang
— ANI (@ANI) May 30, 2022
The aircraft with 22 people including four Indians onboard went missing yesterday. pic.twitter.com/Gn920jfphkNepal Army locates the crash site of Tara Air aircraft at Sanosware, Thasang-2, Mustang
— ANI (@ANI) May 30, 2022
The aircraft with 22 people including four Indians onboard went missing yesterday. pic.twitter.com/Gn920jfphk
दरम्यान सकाळी पुन्हा शोध आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. रात्री हिमवर्षावामुळे यामध्ये अडथळे येत होते. सकाळी पुन्हा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोध आणि बचावकार्य करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अशोक त्रिपाठी (५४), वैभवी बांदेकर-त्रिपाठी (५१), मुलगा धान्यस्य त्रिपाठी (२२) आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी (१८) ( सर्व राहणार कापूरबावडी, ठाणे ) असे विमानात बेपत्ता झालेल्या भारतीय नागरिकांची नावे आहेत. हे सर्वजण नेपाळला पर्यटनासाठी गेले होते. तेथून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्यासाठी विमानात बसले. त्यानंतर हे विमान या प्रवाशांसह बेपत्ता असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांना प्राप्त झाली आहे.
विमानाचे अवशेष सापडले - नेपाळमध्ये पोखरा ते जोमसोम या दरम्यान प्रवाश करताना बेपत्ता झालेल्या तारा एअरलाइन्सचे अवशेष सापडल्याची माहिती समोर आली आहे. नेपाळमधील मुस्टांग परिसरात या विमानाचे अवशेष सापडले आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर बचाव पथक त्या ठिकाणी पोहचत आहे. मात्र, खराब हवामानामुळे या ठिकाणी पोहचण्यास बचाव पथकाला अडचणी येत असल्याची माहिती आहे.
हेही वाचा - Car Crashed in Valley : सिक्कीमच्या खोल दरीत कार कोसळून ठाण्यातील ५ जणांचा जागीच मृत्यू