ETV Bharat / city

भिवंडीत रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा, खड्ड्यात टेम्पो पलटी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Jun 13, 2021, 5:36 PM IST

ठाण्यातील निजामपूर शहरातील एका खड्यात धावता टेम्पो चालकसह रस्त्यावर पलटी झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र अशा एखाद्या दुसऱ्या घटनेत कोणाचा जीव गेला तर त्याला जबबादार कोण ? असा प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद
घटना सीसीटीव्हीत कैद

ठाणे - भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात बहुतांश रस्त्यांच्या मधोमध मोठया ड्रेनेज पाइपलाइनचे काम सुरू आहे. काही रस्त्यांवरील पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले. मात्र पाइपलाइन टाकल्याने खोदलेल्या रस्त्यावरील चरी तांत्रिक पद्धतीने न बुजवता केवळ माती आणि दगडाने चरी भरल्याने दोन दिवस पडत असलेल्या पावसाने रस्त्यात पुन्हा मोठ-मोठे खड्डे पडले. याच खड्ड्यात धावता टेम्पो पटली झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना शहरातील निजामपूर जैतूनपुरा परिसरातून कॉटर गेट मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली. विशेष म्हणजे टेम्पो पटली होतानाचे चित्रीकरण एका दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाल्याने महापालिका अधिकारी व ठेकेदाराचे या रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले आहे.

भिवंडीत रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा, खड्ड्यात टेम्पो पलटी झाल्याची घटना सीसीटीव्हीत कैद

कोणाचा जीव गेला तर त्याला जबबादार कोण?

निजामपूर-जैतूनपुरा परिसरातून कॉटर गेट मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाइपलाइन टाकण्याचे काम ईगल इंफ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले. मात्र काम पूर्ण झाल्यावर रस्ता व्यवस्थित तसेच त्याठिकाणी डांबरीकरण करणे अतिशय गरजेचे होते. मात्र रस्त्यावरील चरी माती आणि खडीने भरल्या जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे पाइपलाइन टाकण्यासाठी अनेक ठिकाणी रस्त्यांवर खोदकाम करण्यात आले आहे. मात्र चरीमध्ये सिमेंटचा थर न टाकता हा खड्डा माती आणि खडीने बुजवण्यात आले. त्यामुळे पावसात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ-मोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याचे पाहवयास मिळत आहे. याच एका खड्यात एक धावता टेम्पो चालकसह कॉटर गेट मशिदीसमोर रस्त्यावर पलटी झाला. ही संपूर्ण घटना शेजारच्या दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत चालकाला किरकोळ दुखापत झाली. मात्र अशा एखाद्या दुसऱ्या घटनेत कोणाचा जीव गेला तर त्याला जबबादार कोण ? असा प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे.

हेही वाचा - घाटकोपरमध्ये स्लॅब कोसळून कार बुडाली पाण्यात; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.