नवी मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो कडून कारवाई करण्यात आली. कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांचा साठा जप्त करून 3 जणांना अटक करण्यात आली. 27 व 28 जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीवरून नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापेमारी केली. यामध्ये 336 एलएसडी ब्लॉट्स जप्त करण्यात आले. तर 430 ग्राम गांजासह 6 ग्रॅम कोकेन हस्तगत करण्यात आले आहे. ही कारवाई नवी मुंबईतील नेरूळ परिसरामध्ये करण्यात आली.
एनसीबीकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार डार्क नेटच्या माध्यमातून या अमली पदार्थाची तस्करी केली जात होती. 27 जानेवारी रोजी मिळालेल्या माहितीवरून एक गाडी अडवण्यात आली होती. गाडीची झडती घेतली असता गांजा सह 121 एलएसडी गोळ्या गाडीत सापडल्या होत्या.
नेरुळ परिसरामध्ये धाड-
यादरम्यान अरबाज शेख व विनीत चंद्रन या दोन आरोपींना अटक करण्यात आली. या दोघांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी नेरुळ परिसरामध्ये धाड मारून 420 ग्राम गांजासह 215 एलएसडी ब्लॉट्स जप्त केले. या प्रकरणी सुरज सिंग याला अटक करण्यात आलेली आहे.
हेही वाचा- मुंबईत कोरोनाचे 394 नवे रुग्ण; 7 रुग्णांचा मृत्यू