ठाणे - महाराष्ट्र म्हणजे विविधतेने नटलेले राज्य म्हणून ओळखला जाते. महाराष्ट्रात सर्व जाती धर्माचे तसेच वेगवेगळ्या प्रांताचे नागरिक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. महाराष्ट्रात सर्व प्रांताचे सण देखील मोठ्या उत्साहात एकत्र येत साजरे होत असतात. (Navratri festival is celebrated in West Bengal culture) अश्याच प्रकारे ठाण्यातील बांगीया परिषदेच्या माध्यमातून गेली ६० वर्ष नवरात्र उत्सव हा बंगाली संस्कृती पद्धतीने साजरा करण्यात येतो त्या विषयी ईटीव्ही भारतने काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
संपूर्ण देखावा उभा राहणार - १९६२ साली स्थापन झालेल्या या मंडळाच्या वतीने बंगाली संस्कृतीतील दुर्गा पूजा नवरात्रीत आयोजित करण्यात येत असते. जे नागरिक पश्चिम बंगालमध्ये जाऊन दुर्गा पूजा करू शकत नाहीत, अशा नागरिकांसाठी नवरात्रीत या पूजेचे आयोजन करण्यात असत. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या देखावे देखील तयार करण्यात येत असतात. यावर्षी याठिकाणी शिकारी शिकार करून आल्यावर कशाप्रकारे आनंदोत्सव साजरा करतात याचा देखावा साकार होणार असून करोडो रुपये खर्च करून हा संपूर्ण देखावा उभा राहणार आहे. विशेष म्हणजे हा देखावा साकारणारे कारागीर देखील पश्चिम बंगाल वरून आले आहेत.
बंगाली संस्कृतीचे होणार दर्शन - बांग्य परिषद या मंडळाच्या वतीने ६ दिवस महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात येणार आहे. तसेच, बंगाली संस्कृतीतील वस्तू आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल देखील असणार यामध्ये महाराष्ट्र आणि इतर राज्यांच्या विविध वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे स्टॉल देखील असणार आहेत अशी माहिती मंडळाचे सेक्रेटरी आकाश कौर यांनी दिली आहे. उत्सवात यंदा बंगाली मेजवानी असणार आहे. तसेच, बंगाली कपडेही खरेदी करता येणार आहेत. इतर राज्यातील सांस्कृतिक कपडेही येथे मिळणार आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र, केरळ आंध्र आणि गुजराती कपड्यांचा समावेश आहे.