ठाणे - कल्याण - शीळ रोडवर धावत्या बसमध्ये अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही बस नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील असून, काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण बस जळून खाक झाली. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा - TB Patients Thane : ठाण्यात टीबीच्या रुग्णांची परवड सुरुच; पोषण आहाराची रक्कमही रखडली ..
तासभर वाहतूक कोंडी
कल्याण शीळ रोडहून नवी मुंबईच्या दिशेने आज दुपारी २ वाजण्याच्या सुमारास नवी मुंबई महापालिकेची बस प्रवाशांना घेऊन जात होती. रूनवाल गार्डन नजिक येताच अचानक बसमध्ये आग लागली. बस चालकाच्या लक्षात आल्याने तात्काळ बस थांबवून बसमधील प्रवाशांना बसखाली उतरवले. तर, आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केल्याने बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे तासभर वाहतूक कोंडी झाली होती.
हेही वाचा - Threat to Eknath Shinde : मंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा धमकी; पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ