ठाणे : रेल्वे रुळा शेजारी गेल्या अनेक वर्षापासून नागरिक तेथे वास्तव्यास आहेत. अचानक त्यांना रेल्वेकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत कोणतीही कार्यवाही करू नये, अशा सूचना रेल्वे पोलीस व आरपीएफ पोलिसांना खासदार राजन विचारे यांनी दिल्या आहेत.
नवीन ठाणे स्थानकाच्या बांधकामाचा घेतला आढावा
मुंबई प्रमाणे ठाणे स्थानकाला ऐतिहासिक महत्व असताना देखील अद्यापही ठाणे स्थानकाला हेरिटेज दर्जा ( Heritage status at Thane station ) देण्यात आला नाही. एवढेच नाहीतर ऐतिहासिक असणाऱ्या ठाणे स्थानकात शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. याबाबत खासदार राजन विचारे आणि रेल्वे प्रशासनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ठाण्यातील रेल्वे स्थानकाला ऐतिहासिक दर्जा मिळावा तसेच रेल्वे स्थानकामधील विविध समस्यां त्यांच्या निदर्शनात आणून देऊन या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या अशी मागणी केली. त्याचबरोबर ठाणे रेल्वे स्थानकातील रेल्वे प्रशासकीय इमारत धोकादायक झाली असून, त्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे देखील खासदारांनी सांगितले.
नवीन ठाणे स्थानकाचे सादरीकरण
नवीन ठाणे स्थानक कसे असेल याचे सादरीकरण देखील यावेळी करण्यात आले. त्याचबरोबर रेल्वे रुळा शेजारी गेल्या अनेक वर्षापासून नागरिक तेथे वास्तव्यास आहेत अचानक त्यांना रेल्वेकडून नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेतयासंदर्भात त्यांचे पुनर्वसन संबंधित प्रश्न निकाली लागेपर्यंत कोणतेही कार्यवाही करू नये. अशा सूचना रल्वे पोलीस व आरपीएफ पोलीसांना यावेळी खासदार राजन विचारे यांनी दिल्या.