ETV Bharat / city

Thackeray faction MP Rajan Vichare : संरक्षणात कपातीनंतर दुर्दैवाने काही घडल्यास मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री जबाबदार- राजन विचारे - शिंदे आणि ठाकरे गट वाद

ठाकरे गटातील खासदार राजन विचारे (Thackeray faction MP Rajan Vichare) यांच्या अंगरक्षक आणि पोलीस सुरक्षामध्ये कपात करण्यात आली (reduction in protection of MP Rajan Vichare) आहे.

Thackeray faction MP Rajan Vichare
ठाकरे गटातील खासदार राजन विचारे
author img

By

Published : Oct 18, 2022, 8:30 AM IST

ठाणे : राज्यातील सत्तांतरानंतर ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटांमध्ये काहीना काही कारणावरून 'तू तू, मैं मैं' सुरू असून काही वेळा आमनसामने येण्याच्या घटना घडल्या आहेत. असे असताना ठाकरे गटातील खासदार राजन विचारे (Thackeray faction MP Rajan Vichare) यांच्या अंगरक्षक आणि पोलीस सुरक्षामध्ये कपात करण्यात आली (reduction in protection of MP Rajan Vichare) आहे. यामुळे खासदार विचारे यांनी संताप व्यक्त केला. ठाण्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र देऊन आपली नाराजी व्यक्त केली आहे. हे पत्र देऊन विचारे यांनी कपात केलेले अंगरक्षक पोलीस यांची सुरक्षा पुन्हा देण्याची विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

शिंदे गटाचे चिथावणीखोर प्रकार : ठाण्यात शिंदे गटाकडुन शाखा बळकावणे, वाचनालय बळकावणे, वषानुवर्षे आनंद चॅरिटेबल ट्रस्टमार्फत सुरु असलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या जागेवर हक्क सांगणे, पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना धमक्या देणे इत्यादी चिथावणीखोर प्रकार तथाकथीत स्वतःला ठाणे जिल्हाप्रमुख समजणाऱ्या नरेश म्हस्के यांच्या निर्देशावरुन होत आहेत. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता शक्यता वर्तवली आहे. तरी सुद्धा आमच्याकडून संयम ठेवलेला आहे. असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

षडयंत्राचा भाग : दरम्यान ठाणे लोकसभेचे खासदार म्हणून ठाणे, नवी मुंबई व मीरा-भाईंदर या शहराशी संलग्न असलेला लोकसभा मतदार संघ असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वारंवार रात्री - अपरात्री फिरावे लागते. त्यामुळे नागरिकांशी थेट जनसंपर्कामुळे मतदार संघात सन २०१९ ला लोकसभेच्या निवडणुकीत ७ लाख ४०हजार ९६९ मते मिळून दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. परंतु शासनाने सूडबुद्धीने त्यांचे अंगरक्षक पोलीस संरक्षणात कपात केल्यामुळे हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो, अशी शंका यावेळी व्यक्त करण्यात आली (protection of MP Rajan Vichare) आहे.

जीवाला धोका : ज्या शिंदे गटात ज्यांना शासकीय व राजकीय असे कोणतेही उच्च पद नाही. त्यांना पोलीस अंगरक्षक पुरविण्यात (Cut in bodyguards and police security) येतात. परंतु लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी खासदार यांची अंगरक्षक पोलीस सुरक्षा कमी केल्यामुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यांची अंगरक्षक पोलीस सुरक्षा पूर्वरत करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली आहे. तसेच दुर्दैवाने अशी काही दुर्घटना घडल्यास त्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार (DCM and CM will responsible) राहतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.