ETV Bharat / city

सत्ताधारी कोविड घोटाळे लपवण्यासाठी गुन्हे दाखल करत आहेत - अभिजित पानसे - Abhijeet panse press conference

बाळकूम येथील कोविड सेंटरमधून २५० नर्सेसला अचानक कमी करण्याच्या नोटीस ठाणे महापालिकेकडून देण्यात आली होती. त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट बाळकूम येथील कोविड सेंटर तसेच ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता ठाण्यातील राजकीय वातारण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे

Abhijeet panse press conference
Abhijeet panse press conference
author img

By

Published : Aug 3, 2020, 7:58 AM IST

ठाणे - महापालिकेच्या बाळकूम येथील कोविड रुग्णालयाच्या मुद्द्यावरून ठाण्यातील वातारण चांगलेच तापले आहे. कोविड रुग्णालयाच्या टेंडरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी केला आहे. ते रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अभिजीत पानसे प्रेस कॉन्फरन्स

कमीत कमी तीन वर्षाचा वैद्यकीय अनुभव असणे आवश्यक असताना केवळ तीन महिन्यांपूर्वी नोंदणी झालेल्या एका कंपनीला या रुग्णालयाचा ठेका देण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. या सर्व भ्रष्टाचारा विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. विशेष म्हणजे चेंबूरची नोंदणी असलेल्या कंपनीचा पत्ता घाटकोपर-मानखुर्द रस्त्यावर एका सध्या इमारतीच्या एका गाळ्याचा असल्याची माहिती त्यांनी उघड केली असून या भ्रष्टाचारामागे पानसे यांनी थेट ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेलाच टार्गेट केले आहे.

बाळकूम येथील कोविड सेंटरमधून २५० नर्सेसला अचानक कमी करण्याच्या नोटीस ठाणे महापालिकेकडून देण्यात आली होती. त्यानंतर मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी थेट बाळकूम येथील कोविड सेंटर तसेच ठाणे महापालिका मुख्यालयाच्या बाहेर आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र आता ठाण्यातील राजकीय वातारण चांगलेच तापायला सुरुवात झाली आहे.

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी पत्रकार परिषद घेऊन कोविड सेंटरचा ठेका ज्या कंपनीला देण्यात आला आहे, त्या कंपनीची मुंबई महापालिकेने नाकारलेले १० हजार पीपीई किट्स ठाणे महापालिकेने घेतले, अशी पोलखोल पत्रकार परिषदेत मनसे नेते अभिजित पानसे यांनी केली आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.