ETV Bharat / city

खड्ड्यांच्या 'राज'कारणावरून मनसे आक्रमक, टोलवरी वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा दिला इशारा - भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण-चिंचोटी फाटा राज्य मार्गावरील अंजुरफाटा ते खारबाव रस्ता

भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण-चिंचोटी फाटा राज्य मार्गावरील अंजुरफाटा ते खारबाव रस्ता खाजगिकरणातून बनवण्यात आला. मात्र, या राज्यमार्गाच्या खड्यांमुळे अत्यंत दुरावस्था झाली. याच खड्यांच्या राजकाणारात आता मनसेही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. येत्या चार दिवसांत या रस्त्याबाबत दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावरील टोल वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण-चिंचोटी फाटा राज्य मार्गावरील अंजुरफाटा ते खारबाव रस्ता

author img

By

Published : Aug 17, 2021, 5:07 PM IST

ठाणे - जिल्ह्यात विवीध शहरात पावसामुळे खड्डयांनी डोके वर काढले आहे. त्यातच भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई-कामण-चिंचोटी फाटा राज्य मार्गावरील अंजुरफाटा ते खारबाव रस्ता खाजगिकरणातून बनवण्यात आला. मात्र, या राज्यमार्गाच्या खड्यांमुळे अत्यंत दुरावस्था झाली. याच खड्यांच्या राजकाणारात आता मनसेही रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. येत्या चार दिवसांत या रस्त्याबाबत दुरुस्ती न केल्यास या रस्त्यावरील टोल वसुली कायमस्वरूपी बंद पडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव
'कोट्यवधी रुपये खड्यांवर खर्च ; तरीही चांगले रस्ते नाहीत'

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामं ठेकेदारांमुळे निकृष्ट व संथगतीने होत असल्याचा आरोप केला होता. त्याचाच हवाला देत मनसेचे अविनाश जाधव यांनी राज्यसरकावर सडकून टीका केली आहे. ठाणे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये शिवसेनेची सत्ता असताना कोट्यवधी रुपये दुरुस्तीवर खर्च करून ही सामान्य नागरीकांना चांगले रस्ते का देत नाहीत. असा प्रश्न उपस्थित केला आहे.

'गाव विकास समितीचेही रास्तारोको आंदोलन'

भिवंडी तालुक्यातील खड्यावरील रस्त्याच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थांच्या गाव विकास समितीच्या नेतृत्वाखाली 18 ऑगष्ट रोजी या रस्त्यावर चार ठिकाणी रास्तारोको आंदोलन केले जाणार आहे. तर, भिवंडी तालुक्यातील मानकोली ते वसई कामण-चिंचोटी फाटा येथपर्यंत अंजुरफाटा ते खारबाव या खाजगिकरणातून बनवण्यात आलेल्या राज्यमार्गाची खंड्यामुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. दरम्यान, या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक बळी गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर निष्पापांची राज्यशासन जबाबदारी घेणार का? असा सवाल उपस्थित करीत चांगले रस्ते बनवा अन्यथा टोल वसुली बंद करा असा इशारा यावेळी मनसेचे जाधव यांनी दिला आहे .

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.