ठाणे एसी लोकल सुरू झाल्यापासून प्रवाशांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे. सुरवातीला कळवा, बदलापूर अंबरनाथ या ठिकाणी प्रवाशांकडून आंदोलन करण्यात आले होते. आता या संघर्षामध्ये राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली असून रविवारी जितेंद्र आव्हाड यांनी प्रवाश्यांसोबत मुंब्रा रेल्वे स्थानकाबाहेर बैठक आयोजित केली होती. Jitendra Awhad called meeting on AC local issue Mumbra या बैठकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आव्हाड यांचे भाषण सुरू असताना आव्हाड यांनी शस्त्र धारी पोलीस हटवण्यास सांगितले नाही, तर आम्ही रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करू असा इशारा दिला आहे.
जितेंद्र आव्हाडांचा इशारा आज ही सभा सुरू असताना जितेंद्र आव्हाड यांनी मी स्वतः तिथे येतो माझ्यावर गोळी चालवा, ट्रेन मधून पडून मरण्यापेक्षा गोळी चालवा असा आक्रमक पवित्र आव्हाड यांनी घेतला. मग त्या ठिकाणी तैनात असलेले शस्त्र धारी पोलीस बंदोबस्त तात्काळ प्रशासनाने हटवले. हे आंदोलन सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी आहे. Jitendra Awhad called meeting on AC local issue Mumbra तसेच मुंब्र्यातील नागरिकांना तुम्ही आतंकवादी केलच आहेत, तर पोलिसांना पण माहित आहे. मुंब्र्यातील लोक कशी आहेत, असा इशारा देखील रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना आव्हाड यांनी दिला आहे.
एसी लोकलच्या विरोधात प्रवाशांचा संताप रेल्वे प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा यासाठी पश्चिम आणि मध्य रेल्वे मार्गावर एसी लोकल सुरु करण्यात आल्या. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एसी लोकलची संख्याही वाढवली जाणार आहे. आधीच मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या ६६ फेऱ्या चालवल्या जात आहेत. मात्र वातानुकूलित लोकलचं तिकिट अधिक असल्याने प्रवाशांनी एसी लोकलकडे पाठच फिरवली आहे. इतकंच नाही तर एसी लोकलविरोधात प्रवाशांचा रोषही वाढत चालला आहे. Jitendra Awhad called meeting on AC local issue Mumbra सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द करुन एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याने प्रवाशांची नाराजी ओढवून घेतली आहे मध्य रेल्वेवरच्या बदलापूर रेल्वे स्थानकावर सामान्य लोकल रद्द करुन एसी लोकल चालवण्याने प्रवाशांचा उद्रेक झाल्याचं दिसून आले. संतापलेल्या प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घातला. ऐन गर्दीच्यावेळी सामान्य लोकल रद्द केल्याने प्रवासी चांगलेच भडकले. कळव्यातही प्रवाशांनी लोकल रोखली होती.