ETV Bharat / city

रिक्षाचालकाचा शोध लागला अन् महिलेचा जीव भांड्यात पडला...

रिक्षामध्ये विसरलेले दागिने पोलिसांनी २४ तासात शोधून दिल्याची एक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध लावून सर्व मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महिलेचा जीव भांड्यात पडला..
महिलेचा जीव भांड्यात पडला..
author img

By

Published : Nov 21, 2020, 7:55 PM IST

Updated : Nov 21, 2020, 8:25 PM IST

ठाणे - एका रिक्षात प्रवास करीत असतानाच त्या महिलेचे ५ तोळ्याचे मंगळसूत्रासह रोख २० हजार रुपये आणि मोबाईल, असा मुद्देमाल एका पिशवीत होता. मात्र ती पिशवी रिक्षात विसरल्याने त्यांना धक्काच बसला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर तपासादरम्यान एका सीसीटीव्हीत फुटेजमध्ये त्या रिक्षाचा नंबर दिसून आला. त्यानंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी २४ तासातच त्या रिक्षाचालका शोधून त्याच्याकडून दागिने, रोख व मोबाईल असा २ लाख ८० हजार रुपयांच्या मैल्यवान वस्तू हस्तगत करून त्या महिलेच्या स्वाधीन केले.

सुशीला नंदकिशोर वाघमारे (वय, ५१) असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. पोलिसांमुळे रिक्षात राहिलेले दागिने आणि पैसे परत मिळाल्याने त्यांचा जीव भांड्यात पडला आणि आनंद व्यक्त केला.

सीसीटीव्हीमुळे पोलिसांना हाती लागला चालक -

सुशीला या शुक्रवारी सकाळच्या सुमारास जंगम हॉटेल ते पूनम हॉटेल जवळील रामेश्वर कॉप्लेक्स या ठिकाणी रिक्षाने घरी जात होत्या. त्यावेळी प्रवासात त्यांच्या जवळील पिशवीमध्ये एक मोबाईल, ५ तोळे सोन्याचे मंगळसूत्र तसेच रोख रक्कम २० हजार अशा मौल्यवान होत्या. मात्र त्या वस्तू त्यांच्याकडून रिक्षामध्ये विसरल्या गेल्या. त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी व त्यांची मुलगी स्नेहा यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार सांगून तक्रार दाखल केली.

रिक्षाचालकाचा शोध लागला अन् महिलेचा जीव भांड्यात पडला...

प्राप्त तक्रारीनुसार पोलिसांनी लागलीच रिक्षाचा शोध सुरू केला. तपासात त्यांनी सुशीला यांनी रिक्षात प्रवास केलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पद्धतीने माहिती मिळवली. तसेच गुप्त बातमीदार मार्फत रिक्षा वाल्याच्याही शोध लावला. त्यांनतर त्यावरील रिक्षाचालक मुनिर मुबारक मुलांनी याचा शोध घेऊन त्याच्याकडून गहाळ झालेले ५ तोळ्यांचे मंगळसूत्र, मोबाईल व रोख रक्कम २० हजार, असा एकूण २ लाख ८० हजार रुपये किमतीचा गहाळ झालेला मुद्देमाल हस्तगत करून तक्रारदार यांच्या स्वाधीन केला.

Last Updated : Nov 21, 2020, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.