ETV Bharat / city

मूकबधीर तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला गुजरातमधून अटक

नराधमाला कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांची 5 तपास पथके या नराधमाच्या शोधात होती. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी मंजूषा शेलार करीत आहेत.

नराधमाला गुजरातमधून अटक
नराधमाला गुजरातमधून अटक
author img

By

Published : Jul 13, 2021, 5:11 PM IST

ठाणे - कल्याण पश्चिम भागातील कल्याण रेल्वे वसाहतीतील एका पडीक बंगल्यात बळजबरीने नेऊन मूकबधीर तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला कल्याण पोलिसांनी सापळा रचून गुजरातमधून अटक केली आहे. शिवाय पीडित तरुणीचा पळवलेला महागडा मोबाईलही त्याच्याकडून हस्तगस्त करण्यात आला. अश्विन राठवा असे या नराधमाचे नाव आहे.

2 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडला प्रकार -

पीडित तरुणी कल्याण पूर्व भागातील कोळसेवाडी परिसरात राहते. ती भिवंडी शहरातील एका कुरिअर कंपनीच्या कार्यालयात काम करते. 2 जुलै रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ती घरातून निघाली. तिच्या भावाने कल्याण पूर्व भागातील स्टेशन परिसरात तिला सोडले. त्यानंतर ती रस्त्याने पूर्व भागातून पश्चिमेला गेली. कल्याण पश्चिमेतील रेल्वे कॉलनीत पोहचली असता एका निजर्नस्थळी आरोपी तिचा पाठलाग करत होता. पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास नराधमाने तिला गाठले आणि तिच्यावर रेल्वेच्या पडीक बंगल्यात खेचत नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यांनतर तिचा महागडा मोबाईल घेऊन पसार झाला होता. पीडित तरुणी कशीबशी सुभाष चौकात पोहचली. ज्या ठिकाणी कामावर जाण्यासाठी तिला बस पकडायची होती. तिथे एका महिलेने तिला पाहिले. तिच्या सोबत काय घडले असावे, याची कल्पना तिला लगेच आली. तिने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनी तातडीने या तरुणीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.

अखेर नऊ दिवसांनी लागला नरधमाचा सुगावा -

कल्याण रेल्वे स्थानकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात आरोपी कैद झाला होता. हा आरोपी ठाणे सीसीटीव्हीतही दिसून आला. कल्याणचे महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि गुन्हे शाखा आरोपीचा शोध घेत होते. अखेर नऊ दिवसांनी नरधमाचा सुगावा लागला. महात्मा फुले पोलिसांनी आरोपीच्या एका मित्राला ताब्यात घेऊन त्याच्याकडून आरोपी कोण आहे, तो कुठे आहे याची माहिती घेतली. पोलीस अधिकारी दीपक सरोदे, पोलीस कर्मचारी सचिन भालेराव, सूचित टिकेकर, रविंद्र हासे यांचे तपास पथक गुजरातमधील अहमदाबाद येथे पोहचले. नराधम अश्विन राठवा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून तरुणीचा मोबाईलही हस्तगत केला आहे.

नराधमाला चार दिवसाची पोलीस कोठडी

आज नराधमाला कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मूकबधीर तरुणीवरील बलात्काराच्या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली होती. पोलिसांची 5 तपास पथके या नराधमाच्या शोधात होती. या गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस अधिकारी मंजूषा शेलार करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.