ETV Bharat / city

ठाण्यात भरधाव रिक्षा खड्यात पलटी, दोन रिक्षा व दुचाकीमध्ये विचीत्र अपघातात १ ठार ४ गंभीर जखमी - Major Accident in Thane

कल्याण - भिवंडी मार्गावर गेल्या साडे तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे कासव छाप गतीने काम सुरू आहे. त्यामुळे यामार्गावर आतापर्यत १० जणांचा जीव गेला. तर ५० हुन अधिक नागरिक जखमी झाले आहेत.

ठाण्यात भरधाव रिक्षा खड्यात पलटी
ठाण्यात भरधाव रिक्षा खड्यात पलटी
author img

By

Published : Feb 2, 2022, 1:50 PM IST

ठाणे - भरधाव रिक्षा खड्यात पलटी होऊन दोन रिक्षा व दुचाकीमध्ये विचित्र भीषण अपघात झाल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात दुचाकी चालक जागीच ठार झाला तर रिक्षामधील चार जण गंभीर जखमी झाले आहे. हि घटना कल्याण - भिवंडी मार्गावरील पिंपळघर गावाच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल समोर घडली आहे. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करून तपास सुरु केला आहे.

अर्धवट सिमेंट रस्त्यावर जागोजगी खड्डे बनले मृत्यूचे सापळे ..
कल्याण - भिवंडी मार्गावर गेल्या साडे तीन वर्षापासून रस्ता रुंदीकरण करून सिमेंट रस्त्याचे कासव छाप गतीने काम सुरू आहे. त्यामुळे यामार्गावर आतापर्यत १० जणांचा जीव गेला. तर ५० हुन अधिक नागरिक जखमी झाले आहेत. त्यातच अर्धवट असलेल्या सिमेंट रस्त्यावरील एक खड्डा कल्याण - भिवंडी मार्गावरील पिंपळघर गावाच्या हद्दीत एका हॉटेल समोर आहे. या रस्त्याच्या मधोमध असलेल्या खड्यात आज पहाटेच्या सुमारास कल्याणहुन भिवंडीकडे जाणारी रिक्षा प्रवाशासह पलटी झाली, त्यापाठोपाठ असलेली दुसरी रिक्षा त्यावर आदळली तर त्या मागेच दुचाकीवरील चालकही रिक्षावर आदळून खड्यामुळे पडला. या भीषण अपघात दुचाकीवरील अकिब शेख (२८ ) याचा जागीच मृत्यू झाला तर रिक्षातील चार जण गंभीर जखमी झाले. जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अपघाताला ठेकेदार व संबंधित विभागाचा अधिकारी जबाबदार..
मृतक अकिब शेख हा कोनगाव मधील ड्रीम कॉम्प्लेक्स समोरील एका इमारती राहणारा होता. आज पहाटे पाच वाजल्याच्या सुमारास दुचाकीवरून रोजच्या प्रमाणे तो कामावर जाण्यासाठी कंपनीत निघाला असता त्याच्यावर काळाने घाला घातला. मृत अकिब शेख याला तीन मुलं पत्नीसह आईवडील भाऊ यांच्या पालनपोषणाची जबाबदारी एकट्यावर होती. मात्र त्याच्या अपघाती निधनाने शेख कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृतकच्या लहान भावाने या अपघाताला रस्त्याचे काम करणारे ठेकेदार व संबंधित विभागाचा अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करून त्यांच्या कठोर कारवाईची मागणी केली आहे. विशेष म्हणजे रस्ता ठेकेदाराने रस्त्यात खड्डा खोदून ठेवला आहे. मात्र या खड्यात भोवती नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठली उपायजोजना व फलक नसल्याने हा विचित्र अपघात झाल्याचे मृतकच्या नातेवाईकाने सांगितले.

खड्डे दुरुस्तीचा प्रश्न कधी सुटणार ..
मार्गावर भीषण अपघात घडल्यानंतर जिल्ह्यातील मंत्री, विरोधी पक्ष नेते केवळ या रस्त्याची पाहणी करण्यासाठी येतात. त्याच वेळी संबंधित अधिकारी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु केल्याचे दाखवता. मात्र मंत्रीसह नेत्यांची पाठ फिरताच खंड्याचे काम अर्धवट असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे खड्यांच्या राजकारणावरून विरोधी पक्ष असलेले मनसे, भाजपचे लोकप्रतिनिधी व नेते महाविकास आघाडीला जबाबदार धरून रस्ता दुरुस्तीची मागणी करतात. मात्र तोपर्यत खड्यामुळे अनेक अपघात होऊन त्यांमध्ये नागरिकांचा हकनाक बळी जातो. तर काही नागरिक गंभीर होत आहे. त्यामुळे रांजणोली ते दुर्गाडी पुलापर्यत असलेल्या अर्धवट सिमेंट रस्तामुळे होणारी अपघाताची मालिका कधी थांबणार ? असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

१० हुन अधिक नागरिकांचा मृत्यू ..
विशेष म्हणजे या अपघातापूर्वीच याच रस्तावरील खड्यात दोन महिन्यापूर्वी एका नागरिकाचा अपघात झाला होता. त्याच नागरिकाने अपघाताचा केंद्र बिंदू असलेल्या खड्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करीत असतानाच एक भरधाव रिक्षा त्याच खड्यात आदळून पलटी होऊन अपघात झाल्याचा प्रकारही कॅमेऱ्यात कैद केला. त्यांनतर हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हि घटना समोर आली होती. मात्र त्यावेळी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्याने ठेकेदाराची बाजू घेऊन त्या ठिकाणी खड्डा नसल्याचे प्रसिद्ध पत्रक काढून तो अपघात बनाव असल्याचे नमूद केले होते. विशेष म्हणजे या सिमेंट रस्त्याचे काम सुरु होऊन साडे तीन वर्षाच्या कालावधीत उलटून गेला. मात्र कासव छाप गती व खड्यामुळे आतापर्यत १० हुन अधिक नागरिकांचा जीव गेला. तर ५० हुन अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.