ETV Bharat / city

रेल्वे रुळांची दुरुस्ती करताना कामगाराचा मृत्यू; मशीन ऑपरेटरला अटक

अबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन रेल्वे ट्रॅकवर २७ जानेवारी रोजी पहाटे रेल्वे रुळांची दुरुस्ती करीत असताना अंगावर सिमेंट स्लिपर पडून एका कामगाराचा मृत्यू तर दोन कामगार गंभीर जखमी झाले होते.

than
than
author img

By

Published : Jan 29, 2021, 11:58 PM IST

ठाणे - अबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन रेल्वे ट्रॅकवर २७ जानेवारी रोजी पहाटे रेल्वे रुळांची दुरुस्ती करीत असताना अंगावर सिमेंट स्लिपर पडून एका कामगाराचा मृत्यू तर दोन कामगार गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात एटीआरटी मशिनच्या ऑपरेटरला निष्काळीज करून अपघातात केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

ऑपरेटरला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

सुनिल कुमार उर्फ सोनु सिंग असे अटक केलेल्या मशीन ऑपरेटरचे नाव असून त्याच्यावर बेजबाबदार व निष्काळजीपणे त्याच्या ताब्यातील गैन्ट्री वेगाने चालविल्याने बीआरएनचा स्टॉपर निघून डिरेल होवुन ती इजिनच्या लोंगहॅन्डवर जावुन आदळल्याने त्या ठिकाणी उभे राहुन सिमेंट स्लिपर ठेवण्याचे काम करीत असलेल्या कामगारपैकी गणेश किसन सिद, (वय 20 रा. कारेगाव, जि.पालघर ), वासूदेव भावडो सिद, (वय 26,रा. .कारेगाव, जि. पालघर ) हे गंभीर जखमी झाले होते. तर राजु सनू अगरे, (वय 36, वर्षे, कारेगाव,जि. पालघर ) हा कामगार रेल्वे इंजिन व गॅन्ट्री गिअर बॉक्स मध्ये दबुन त्याचा त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने मशीन ऑपरेटरला जबाबदार धरून बाबत त्याच्या विरोधात भा.दं.वि. 304(अ), 337, 338 अन्वये कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अटक आरोपी सुनील कुमार उर्फ सोनू सिंग याला आज कल्याण रेल्वे न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

रेल्वे रुळाची दुरुस्ती करताना घडला अपघात

अंबरनाथ ते बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना रेल्वे रुळाचे मेंटेनन्स करणाऱ्या मशीनमध्ये बिघाड झाला. यामुळे रूळ खाली टाकण्यात येणारे सिमेंटचे रुळाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना त्यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात घडल्यानंतर बदलापूर होऊन मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. विशेष म्हणजे पहाटे दोन ते पाच वाजताच्या सुमारास हे काम सुरू होते. काम सुरू असतानाच रेल्वे रुळाखालील स्लीपर्स टाकणाऱ्या मशिनमध्ये बिघाड झाल्यानेपहाटे तीन वाजता मशीन वरील स्लीपर्स कामगारांच्या अंगावर पडून जखमी झाले होते.

अपघातामुळे रेल्वे वाहतूक झाली होती ठप्प

संबंधित मशीन रेल्वे रुळावर अडकून पडले असून ते हटवण्यासाठी रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने प्रयत्न केले. मात्र २७ जानेवारी रोजी सकाळी सात वाजेपर्यंत मशीन हटविण्यात त्यांना अपयश आल्याने अखेर या मशीनला हलविण्यासाठी क्रेन मागविण्यात आले आहे. या क्रेनच्या साह्याने मशीन हलवण्याचे काम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केले होते. मात्र सकाळी साडेआठ वाजेपर्यंत ते मशीन हलवण्यात आलेले नाही. दरम्यान, हा अपघात कोणाच्या चुकीमुळे घडला याबाबत त्यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु केली होती. मात्र या घटनेमुळे कल्याण - कर्जत मार्गावर रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.