ETV Bharat / city

ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचार, पीडिता चार महिन्यांची गर्भवती - ठाणे पोलीस बातमी

लग्नाचे आमिष दाखवून प्रीयकराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

lover-physical-abuse-by-showing-her-a-desire-to-get-married
ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचार
author img

By

Published : Mar 9, 2020, 3:14 PM IST

ठाणे - लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय प्रेयसीवर २५ वर्षीय धोकेबाज प्रियकराने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे प्रियकराच्या अत्याचारामुळे पीडिता ४ महिन्याची गर्भवती आहे. मात्र, पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेत, तुज्या गर्भातील बाळ माझे नाही. असे बोलून प्रियकराने लग्न करण्यास नकार दिला. याप्रकरणी पीडितेने खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रियकरावर अत्याचारासह, पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सूरज पाटील (वय, २५) असे गुन्हा दाखल झालेल्या प्रियकराचे नाव आहे.

ठाण्यात लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर अत्याचार

मिळालेल्या माहितीनुसार पीडिता खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहते. पीडिता दहावीत शिक्षण घेत असताना आरोपी सूरजने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर वर्षभरात पीडिता अल्पवयीन असताना तिला लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने घरी बोलवून तिच्या अत्याचार केला होता. तेव्हापासून प्रियकराच्या वारंवार होणाऱ्या अत्याचारामुळे पीडिता दीड महिन्याची गरोदर राहिली होती. मात्र, तिला त्यावेळी आपण लवकरच लग्न करणार असल्याचे सांगत तिला गर्भपाताचे औषध देऊन तिचा गर्भपात करण्यास भाग पाडले होते.

प्रियकाराने पुन्हा पीडितेशी जवळीक साधत तिला लग्नाचे आमिष देवून तिच्यावर अत्याचार केले. या अत्याचारामुळे ती पुन्हा गरोदर राहिल्याने तिने गेल्या काही दिवसापासून त्याच्याकडे लग्न करण्याचा तगादा लावला. मात्र, प्रियकराने तिच्या चारित्र्यावर संशय घेत, तुच्या गर्भातील बाळ माझे नाही. असे बोलून लग्न करण्यास नकार दिला. आपली फसगत झाल्याचे पीडितेला समजल्यावर तिने प्रियकर सूरज पाटील विरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन त्याच्यावर अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरक्षक कदम करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.