नवी मुंबई - पनवेल महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेने दिली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 6 हजार 628 झाला आहे. आत्तापर्यंत 165 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळेच मनपाने हा निर्णय घतला आहे.
31 ऑगस्टच्या मध्यरात्री पर्यंत हे लॉकडाऊन सुरू राहणार आहे. कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त संपूर्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दिनांक 31 मे 29 जून व 29 जुलै 2020 आदेशानुसार जाहीर केल्याप्रमाणे मिशन बिगीन अगेन सुरुच राहणार आहे. याबाबत अधिक माहिती पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.