ठाणे - कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. ठाण्यातील जांभलीनाका मार्केटमध्ये पाहिले असता लॉकडाऊनला मोठा प्रतिसाद लोकांनी दिला. जांभलीनाका मार्केट परीसर वर्दळीचा असतो. पोलीसांनी रस्त्यात बॅरिगेट्स लावले आहे. पोलीस सतत लोकांना नियम पाळण्याचे आवाहन करत आहेत. याला मागरीकांना चांगला प्रतिसाद दिला आहे.
विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लक्ष-
सरकारने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी 15 दिवस कडक लॉकडाऊन केला आहे. काल रात्री 8 वाजेपासून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी मुलुंड टोल नाका येथे बॅरिगेट्स लावत पोलीस प्रत्येक वाहनांची तपासणी करत आहे. यामध्ये अत्यावशक सेवा वगळता विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर मुंबई पोलीस कारवाई करत आहेत.
तसेच नेहमी सकाळच्या वेळी मुलुंड टोल नाक्यावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची वर्दळ असते. ती आज तुरळक प्रमाणत दिसून येत आहे.
हेही वाचा- भय इथले संपत नाही... नागपुरात २४ तास जळतायेत चिता