ETV Bharat / city

मुंबईकरांना ठाकरे सरकारचा पाच हजार कोटींचा फटका; आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची सोमैयांची मागणी - किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे सरकारच्या उद्धटपणामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका बसला असल्याची घणाघाती टीका भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे पाच वर्षांसाठी लांबला असून, याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला असल्याचे सोमैया यांनी सांगितले.

kirit somaiya
भाजप नेते किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया
author img

By

Published : Dec 16, 2020, 3:20 PM IST

ठाणे - उद्धव ठाकरे सरकारच्या उद्धटपणामुळे मुंबईकरांना पाच हजार कोटींचा फटका बसला असल्याची घणाघाती टीका भाजप नेते किरीट सोमैया यांनी केली आहे. मुंबईतील मेट्रो प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या हट्टामुळे पाच वर्षांसाठी लांबला असून, याचा मोठा फटका मुंबईकरांना बसला असल्याचे सोमैया यांनी सांगितले. कांजूरमार्ग येथील जागा केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यावर राज्य सरकारने मेट्रोचे बांधकाम करणे हे खोटेपणाचे काम असून, त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी सोमैया यांनी केली.

भाजप नेते किरीट सोमैया यांची प्रतिक्रिया

मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्या -

मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे बालिशपना करत आहेत, ही लोकशाही आहे. बोलायचे आहे तर कोर्टात जा, उद्धव ठाकरेँचा उद्धटपणा नडला आहे. त्याबाबत पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमैया यांनी यावेळी केली आहे.

प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई का नाही?

ठाण्यातील रेमंड कंपनीसमोर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी 13 मजल्याचे दोन टॉवर बांधले व ओसी न घेताच सर्व फ्लॅटची विक्री केली, असा आरोप सोमैया यांनी केला. 2008 साली ठाणे पालिकेने सदर बांधकामाला अनधिकृत ठरवले व तोडक कारवाईचे आदेश दिले. परंतु, आजतागायत त्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रताप सरनाईक यांनी सामान्य नागरिकांची फसवणूक केली असून, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देखील किरीट सोमैया यांनी केली. त्याच अनुशंगाने येत्या शुक्रवारी सोमैया ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्टेशनला सरनाईक यांच्याविरोधात फ़ौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी जाणार आहेत.

हेही वाचा -अभिनेता अर्जुन रामपाल एनसीबीच्या चौकशीसाठी गैरहजर

ठाकरे सरकारच्या बाळहट्टामुळे मुंबईकरांचे नुकसान -

उद्धव ठाकरे हे फसवणूक करत आहेत. मेट्रो कारशेडबाबत तसा रिपोट आला होता की, ही जागा देता येत नाही. मात्र, बाळहट्ट आणि राजहट्टापोटी ठाकरे यांनी जे केले त्यामुळे ठाकरे सरकारने मुंबईकरांची माफी मागावी व मंत्री आदित्य ठाकरे यांनी राजीनामा द्यावा. यासोबत सामना हे नेहमी आपली स्टॅटेर्जी वापरत आहे. नेहमी नेहमी विषय डायव्हर्ट करत असतात, असाही टोला किरीट सोमैया यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.