ETV Bharat / city

Murder accused acquitted Thane : हत्या करून अपघाताचा बनाव; सबळ पुराव्याअभावी चार आरोपींची निर्दोष मुक्तता - हत्या करून अपघाताचा बनाव

हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली (Accused of destroying evidence) 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शहापूर तालुक्यातील शिरोळ गावातील चारही आरोपींची सबळ पुराव्याच्या अभावाने कल्याण जिल्हा न्यायालयाचे (Kalyan Session Court) अतिरिक्त सत्र न्यायाधिश शौकत गोरवाडे (acquittal of accused in murder) यांनी निर्दोष मुक्तता (acquittal of accused due to lack of strong evidence) केली. न्यायमूर्तींनी दिलेल्या निकालात सरकारी पक्षाला आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात अपयश (Failure produce strong evidence against accused) आल्याचा ठपका ठेवला.

हत्या करून अपघाताचा बनाव
हत्या करून अपघाताचा बनाव
author img

By

Published : Sep 19, 2022, 2:28 PM IST

ठाणे : हत्या करून मृतदेह रेल्वे रुळावर टाकून अपघाताचा बनाव करत पुरावे नष्ट करण्याच्या आरोपाखाली (Accused of destroying evidence) 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, शहापूर तालुक्यातील शिरोळ गावातील चारही आरोपींची सबळ पुराव्याच्या अभावाने कल्याण जिल्हा न्यायालयाचे (Kalyan Session Court) अतिरिक्त सत्र न्यायाधिश शौकत गोरवाडे (acquittal of accused in murder) यांनी निर्दोष मुक्तता (acquittal of accused due to lack of strong evidence) केली. न्यायमूर्तींनी दिलेल्या निकालात सरकारी पक्षाला आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे सादर करण्यात अपयश (Failure produce strong evidence against accused) आल्याचा ठपका ठेवला.

पुराव्याअभावी चौघे सुटले निर्दोष - सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या आरोपींमध्ये शंकर मंग्या पिंगळा (35), यशवंत काळू भगत (45), काशिनाथ भाऊ गावंडा (32) आणि अंत्या सोमा पारधी (30) यांचा समावेश आहे. आरोपींच्यावतीने ॲड. गोविंद निकम यांनी युक्तीवाद करत या प्रकरणातील अटकेतील आरोपींचा कोणताही सहभाग नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

'तो' आपल्या घरी परतलाच नाही - या पार्श्वभूमीवर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तीवादात मृत संजय सन्या बांगरे हा शहापूर तालुक्यातील नांदगाव येथे आपल्या पत्नी छायासोबत राहत असताना कौटुंबिक कलहातून अनेकदा या दाम्पत्यामध्ये वाद व्हायचे. पत्नी छाया ही आपल्या माहेरी शिरोळ गावी निघून गेली. मुलीला मारहाण केल्याचे छायाच्या वडिलांना रुचले नाही. पत्नीला घरी आणण्यासाठी गेल्यानंतर छायाच्या वडिलांनी जावई संजय बांगरे याला समज दिली. पुन्हा मुलीला मारु नको आणि आमच्या घरी येऊ नको, असे समजावले. त्यानंतर संजय पुन्हा 21 सप्टेंबर 2010 रोजी शिरोळ गावात सासरवाडीला गेला. त्यानंतर तो आपल्या घरी नांदगावला परतला नाही. त्याच्या कुटुंबीयांनी शोध घेतला.

रेल्वे रुळावर आढळला संजयचा मृतदेह - त्यानंतर त्यांना त्याच दिवशी 21 सप्टेंबर रोजी धक्कादायक माहिती मिळाली. एका तरुणाचा मृतदेह खर्डी आणि उंबरमाळी रेल्वे स्थानकांदरम्यान आढळून आला. घटनास्थळी जाऊन पाहिले असता हा मृतदेह संजयचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह सापडल्यानंतर संजयच्या नातेवाईकांनी कल्याण लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला व अटकेची कारवाई केली होती. आता याच आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आल्याचे ॲड. गोविंद निकम यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.