ETV Bharat / city

नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत रिक्षाचालकाचे अपहरण - thane crime news

सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ त्यांचे हस्तक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहे.

thane
thane
author img

By

Published : Feb 25, 2021, 5:54 PM IST

Updated : Feb 25, 2021, 7:28 PM IST

ठाणे - व्याजाच्या रक्कमेवरून रिक्षाचालकाला नगरसेवकाच्या हस्तकांकडून बेदम मारहाण करत फिल्मी स्टाइल अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पूर्वेकडील पिसवली गावात घडली असून याप्रकरणी अपक्ष नगरसेवकासह ८ ते १० हस्तकांवर मानपाडा पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. सुमित सिंग असे बेदम मारहाण करीत अपहरण केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर राजन दुबे, रोहित राठोड, सचिन माने, पांडे, धीरज पाटील, आणि अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि ७ ते ८ त्यांचे हस्तक असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहे.

नगरसेवकाच्या हस्तकाचा सावकारीचा व्यवसाय

रिक्षा चालक सुमितने रिक्षा दुरुस्तीसाठी नगरसेवकाचा खास हस्तक असलेल्या रोहित राठोड व राजन दुबे यांच्याकडून व्याजाने ३० हजार घेतले होते. ही रक्कम ६०० रुपये महिना देण्याचे ठरवून रिक्षा चालकाने त्या सावकाराला रक्कम दिल्याचे सांगितले. तरीही आगाऊ ६ हजार व्याजाचा त्याच्यामागे तगादा लावला असता, रिक्षाचालकाने देण्यास नकार देताच आरोपी सावकार व त्याच्या साथीदारांनी मिळून रिक्षाचालकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करीत त्याला रस्त्यावर फरफट नेले. त्यामुळे सुमित गंभीर जखमी झाला.

नगरसेवकाच्या घरी नेऊन मारहाण

मध्यरात्री अडीज वाजता पुन्हा काही आरोपी सुमितच्या घरी आले. आणि त्याला घरातूनच एका वाहनात जबरदस्तीने बसवून त्याला नगरसेवकाच्या घरी नेले. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यानी सुमितच्या तोंड काळ्या कपड्याने झाकून नगरसेवकाच्या घरी आणले. याठिकाणी नगरसेवक कुणाल पाटील आणि त्याच्या हस्तकाने पुन्हा मारहाण करण्यात आली. तर नगरसवेकाने तक्रार मागे घेण्यासाठी दबाब टाकून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे सुमितने सांगितले. त्यांनतर कसाबसा आरोपींच्या तावडीतून सुटून सुमित घरी पोहोचला. घरच्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात दखल करून मानपाडा पोलीस ठाण्यात नगरसेवकासह १० ते १२ हस्तकांवर विविध कलमानुसार गुन्हा करण्यात आला. राजकीय वादातून माझे नाव गोवण्यात आले. .. या बाबत नगरसेवक कुणाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, राजकीय वादातून माझे नाव या गुन्ह्यात गोवण्यात आले असून घटना घडली त्यादिवशी मी शहरातच नव्हते असे सांगत गंभीर गुन्ह्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

Last Updated : Feb 25, 2021, 7:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.