ठाणे - राष्ट्र्वादीचे शरद पवार यांच्यावर वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर टाकणारी आरोपी केतकी चितळे हिला ठाणे न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान केतकी चितळेच्या ( Ketki Chitale ) वकिलांनी कळवा पोलीस ( Kalwa Police Station ) ठाण्यात दाखल गुन्ह्यात जामीन मिळावा म्हणून अर्ज केला होता. मात्र आज ( गुरुवारी ) ठाणे सत्र न्यायालयाने तो अर्ज ( Thane Sessions Court rejects bail application ) फेटाळला आहे. केतकीवर दाखल गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा आहे, त्यामुळे तिचा जामीन नामंजूर करण्यात येत असल्याचे यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण? : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल १३ मे रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर केतकीचा शोध घेत असतांना केतकीला १४ मे रोजी नवी मुंबईतील कळंबोली येथील तिच्या राहत्या घरातून तिला ताब्यात घेतले होते. त्यानंतर केतकीला ठाणे सत्र न्यायालयात हजर केले असता या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी ठाणे पोलिसांनी तिची पोलीस कोठडी मागितल्याने ठाणे न्यायालयाने तिला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. केतकीची ५ दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर तिला पुन्हा न्यायालयात हजर केले असता ठाणे न्यायालयाने तिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्यात केतकीवर २०२० साली अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असल्याने १९ मे रोजी रबाळे पोलिसांनी ठाणे कारागृहातून केतकीचा ताबा घेतल. याप्रकरणी पोलीस तपास करण्यासाठी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र या प्रकरणात तरी केतकीला जामीन मिळेल असे तिला आणि तिच्या वकीलांना वाटत असतांना ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला रबाळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आणि तिची रवानगी पुन्हा थेट ठाणे मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती.
हेही वाचा - Sanjay Raut Criticized Sambhaji Raje : 'संभाजीराजेंना विनंती त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घ्यावा'