ठाणे - काशिमीरा पोलिसांनी मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका गुन्हेगाराला अटक केली आहे. या आरोपीकडून दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या. या आरोपीचा एक साथीदार सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
मीरा भाईंदर शहरात गेल्या काही दिवसात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या संदर्भात शहरातील अनेक पोलीस ठाण्यात तक्रारी देखील दाखल आहेत. त्यामुळे पोलिसांनी सध्या मोटारसायकल चोरी करणाऱ्या गुन्हेगारांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अशाच एका अट्टल मोटारसायकल चोराला काशिमीरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीकडून दोन मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. बाजारभावाप्रमाणे या गाड्यांची किंमत १ लाख पाच हजार रुपये इतकी आहे. ही कारवाई मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ-१ चे उपायुक्त अमित काळे, काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.