ETV Bharat / city

मुलाला भेटण्याच्या ओढीने तुरुंगातून पळालेल्या कैद्याला 24 तासात पुन्हा कोठडी - कल्याण जिल्हा सत्र न्यायालय

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे. हा कैदी मुलाच्या आठवणीने तुरुंगातून फरार झाल्याचे समोर आले आहे.

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे.
author img

By

Published : Jul 26, 2019, 10:34 PM IST

ठाणे - कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे. हा कैदी मुलाच्या आठवणीने तुरुंगातून फरार झाल्याचे समोर आले आहे. राजेंद्र आदिनाथ जाधव (वय 39) असे या कैद्याचे नाव असून, तो डोंबिवली नजीकच्या कोळेगावचा रहिवासी आहे. संबंधित कैद्याची काही दिवसांनी शिक्षा पूर्ण होणार होती.

कैदी राजेंद्र जाधव याला गुरुवारी दुपारच्या सुमारास तुरुंगाच्या आवारातील झाड लोड करण्यासाठी सुरक्षा रक्षकाने आवारात आणले होते. याच संधीचा फायदा घेऊन त्याने धूम ठोकली. नंतर तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासात गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून पुन्हा पोलीस कोठडी दिली आहे.

कैदी शुक्रवारी सकाळी बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील कोळेगाव सर्कल येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जॉन यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने या परिसरात जाळे पसरले. मात्र, पोलिसांनी सापळा लावल्याचा संशय आल्याने राजेंद्रने धूम ठोकली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला जेरबंद केले.

चौकशीदरम्यान, या कैद्याच्या विरोधात डोंबिवलीच्या टिळकनगर आणि कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. याच गुन्ह्यांच्या आरोपाखाली कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, यापूर्वीही दोन सराईत गुन्हेगारांनी आधारवाडी तुरुंगातून केबलच्या साहाय्याने भिंतीवर चढून पळ काढला होता. यामुळे तुरुंग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Intro:किट नंबर 319
कल्याण

Body:मुलाला भेटण्याच्या ओढीने तुरुंगातून पळून गेलेल्या बापाला 24 तासात पुन्हा जेलवारी

ठाणे : कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातून फरार झालेल्या कैद्याला चोवीस तासाच्या आत कल्याण गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करून त्याला पुन्हा जेलवरी घडवली आहे, खळबळजनक बाब म्हणजे या कैद्याला मुलाची आठवण आल्याने त्याला भेटण्यासाठी तुरुंगातून फरार झाल्याचे समोर आले आहे, तर त्याची तुरुंगातून काही दिवसांनीच शिक्षा पूर्ण होऊन सुटका होणार होती, राजेंद्र आजिनाथ जाधव वय 39 असे या कैद्याचे नाव असून तो डोंबिवली नजीकच्या कोळेगाव येथील संजीत संते बिल्डिंग मध्ये राहणार आहे,
कैदी राजेंद्र जाधव याला गुरुवारी दुपारच्या सुमारास तुरुंगाच्या आवारातील झाड लोड करण्यासाठी तुरुंगातील सुरक्षा रक्षकाने आवारात आले होते याच संधीचा फायदा घेऊन त्याने आवाराच्या बाहेरून धूम ठोकली, त्यानंतर तुरुंग प्रशासनाच्या तक्रारीनुसार त्याच्याविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात फरार झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, तेव्हापासून खडकपाडा पोलीस या कैद्याला हुडकून काढण्यात जंगजंग पछाडत होते, मात्र हा कैदी शुक्रवारी सकाळी बदलापूर पाईपलाईन रोडवरील कोळेगाव सर्कल येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर कल्याण क्राइम ब्रांच वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जॉन यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार निलेश पाटील, नितीन मुडगून , विलास मालशेट्टे, दत्‍ताराम भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप , अजित राजपूत आणि प्रकाश पाटील या पोलिस पथकाने परिसरात जाळे पसरले, मात्र पोलिसांनी सापळा लावल्याचा संशय आल्याने राजेंद्र याने तेथूनही धूम ठोकली, त्यानंतर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले,
चौकशीदरम्यान तो रेकॉर्डवरील रिक्षा चोर असल्याची माहिती हाती आली, या कैद्याच्या विरोधात डोंबिवलीच्या टिळकनगर आणि कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात रिक्षा चोरीचे गुन्हे दाखल आहेत , याच गुन्ह्याच्या आरोपाखाली कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली असल्याने त्याची रवानगी आधारवाडी तुरुंगात करण्यात आली तेव्हापासून हा कैदी शिक्षा भोगत आहे, आता पुढील तपासासाठी या कैद्याला खडकपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे,
दरम्यान यापूर्वीही दोन सराईत गुन्हेगारांना आधारवाडी तुरुंगात शिक्षा भोगण्यासाठी ठेवले असता त्या दोन्ही कैद्यांनी तुरुंगाची भिंत केबलच्या सहाय्याने चडून तुरुंगाच्या मागच्या बाजूने पळ काढला होता, या कैद्यांचा भिंतीवरून चढतानाचा सीसीटीव्ही भलताच व्हायरल झाला होता, मात्र पोलिसांनी या दोन्ही कैद्यांना बेंगलोर शहरातून अटक केली होती, यामुळे तुरुंग सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे,
ftp fid (1 vis, 2 photo)
mh_tha_4_jail_prisoner_arrest_1_vis_2_photo_10007

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.