ETV Bharat / city

सिव्हिलमधील रुग्णाला मुंब्र्यात असल्याची नातेवाईकांना 'कळवा' रुग्णालयाने दिली खोटी माहिती, रुग्णाचा झाला मृत्यू - कळवा रुग्णालयाचा कोरोनाबाधिताचा चुकीचा अहवाल

कळवा रुग्णालयाचा आणखी एक गलथान कारभार समोर आला आहे. एका 50 वर्षीय व्यक्तीला 13 जूनला या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 17 जून रोजी त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला. त्यानंतर बुधवारी त्याच्या नातेवाईकांना रुग्णालय व्यवस्थापनाने फोन करुन रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला मुंब्य्रातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले. मात्र नातेवाईकांनी या रुग्णालयात शोध घेतला असता, तो रुग्ण तेथे दाखल नसल्याचे उघड झाले.

thane
रुग्णालयात दाखल झालेले नातेवाईक
author img

By

Published : Jun 20, 2020, 3:35 PM IST

ठाणे - कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला मुंब्र्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती 'कळवा' रुग्णालयाने नातेवाईकांना दिली होती. त्यावरुन मुंब्र्याच्या खासगी रुग्णालयात नातेवाईकांनी चौकशी केली असता, असा कोणताच रुग्ण त्या रुग्णालयात नसल्याची माहिती खासगी रुग्णालयाने दिली. त्यामुळे नातेवाईकांनी पुन्हा कळवा रुग्णालय गाठून चौकशी केली असता, नातेवाईकांना फोन क्रमांक देण्यात आला. तो सिव्हिल रुग्णालयाचा निघाल्यामुळे नातेवाईकांनी तेथे धाव घेतली. मात्र तेथे पोहोचल्यावर नातेवाईकांना त्या कोरोनाबाधिताचा मृतदेहच घ्यावा लागल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांसह कोकण पदवीधर मतदार संघाचे भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

thane
रुग्णालयात दाखल झालेले नातेवाईक

रुग्णांचा चुकीचा अहवाल देण्यामुळे कळवा रुग्णालय चर्चेत असताना त्याचा आणखी एक गलथान कारभान समोर आला आहे. एका 50 वर्षीय व्यक्तीला 13 जून रोजी या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 17 जून रोजी त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझीटीव्ह आला. दरम्यान रुग्णासाठी लागणारे औषधे देखील रुग्णालयाला आणून दिली होती. परंतु बुधवारी त्याच्या नातेवाईकांना रुग्णालय व्यवस्थापनाने फोन करुन रुग्णाची प्रकृती खालावल्याने त्याला मुंब्य्रातील खासगी रुग्णालयात हलविण्यात आल्याचे सांगितले. त्या रुग्णालयाचा दुरध्वनी क्रमांकही देण्यात आला.

नातेवाईकांनी तो या खासगी रुग्णालयात दाखल आहे किंवा नाही, याची माहिती घेण्यासाठी थेट रुग्णालय गाठले. तर त्याठिकाणी त्यांनी जे नाव सांगितले, त्या नावाचा कोणताही रुग्ण दाखलच नसल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले. त्यानंतर गुरुवारी पुन्हा हे नातेवाईक कळवा रुग्णालयात आले असता, त्यांना पुन्हा तेच उत्तर देण्यात आले. परंतु यावेळेस त्यांनी दुरध्वनी क्रमांक देताना दुसरा नंबर दिला. त्या क्रमांकावर फोन केला असता, तो ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाचा असल्याचे त्यांना समजले. परंतु ते रुग्णाची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जाण्यापूर्वीच त्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता कळवा रुग्णालयाच्या या गलथान कारभाराची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. तर कळवा रुग्णालयाकडून वारंवार असे प्रकार घडत असून महापालिका प्रशासन आता तरी जागे होणार का ? असा सवाल निरंजन डावखरे यांनी उपस्थित केला असून या प्रकरणाची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.