ETV Bharat / city

Kalwa Bridge Work : कळवा पुलाच्या कामाला पाचव्यांदा मिळणार मुदतवाढ; जून अखेरीस एक टप्पा पूर्ण होण्याची शक्यता - कळवा खाडी बांधकाम सद्यस्थिती

ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल ( two creeks connecting Thane and Kalwa ) आहेत. त्यापैकी जुना झालेला ब्रिटिशकालीन खाडीपूल ( oldest British creek bridge ) काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर दुसऱ्या खाडी पुलावरून सद्य:स्थितीत वाहनांची वाहतूक सुरू आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडू लागला आहे. यामुळे ठाणे आणि कळवा भागांत कोंडी होत आहे. ही कोंडी फुटावी तसेच भविष्यातील वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेने येथे तिसरा खाडी पूल ( Thane Municipal Corporation third creek bridge ) उभारण्यात येत आहे.

कळवा पुलाच्या कामाला पाचव्यांदा मिळणार मुदतवाढ

author img

By

Published : May 21, 2022, 10:37 AM IST

ठाणे - ठाणे आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या कळवा खाडीवर उभारण्यात ( third flyover at Kalwa creek ) येणाऱ्या तिसऱ्या उड्डाणपुलाचे काम चार डेडलाईन संपल्या तरीही अजून पूर्ण झाले नाही. आता पावसाळ्यानंतर हे संपूर्ण पुलाचे काम पूर्ण होईल असा अंदाज पालिका प्रशासन ( municipal administration on Kalwa flyover ) वर्तवित आहे. जून अखेरीस एक टप्पा पूर्ण होईल असा विश्वास पालिका प्रशासनाने वर्तविला आहे.

ठाणे आणि कळवा तसेच नवी मुंबई या शहरांना जोडण्यासाठी दोन खाडीपूल ( two creeks connecting Thane and Kalwa ) आहेत. त्यापैकी जुना झालेला ब्रिटिशकालीन खाडीपूल ( oldest British creek bridge ) काही वर्षांपूर्वीच वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तर दुसऱ्या खाडी पुलावरून सद्य:स्थितीत वाहनांची वाहतूक सुरू आहे. वाहनसंख्येच्या तुलनेत हा पूल अपुरा पडू लागला आहे. यामुळे ठाणे आणि कळवा भागांत कोंडी होत आहे. ही कोंडी फुटावी तसेच भविष्यातील वाहतुकीचे नियोजन व्हावे यासाठी ठाणे महापालिकेने येथे तिसरा खाडी पूल ( Thane Municipal Corporation third creek bridge ) उभारण्यात येत आहे. मात्र, गेली दोन वर्षे हा पूल रखडत होता. डिसेंबर २०१९मध्ये या पुलाच्या कामास डिसेंबर २०२०पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र, कोरोना टाळेबंदीमुळे पूल उभारणीची कामे रखडली. आता या पुलाची 89 टक्के कामे पूर्ण झाले आहे. त्यापैकी केवळ 11 टक्के कामे शिल्लक आहे.

निधीची तरतूद- पालिकेची आर्थिक स्थिती खालावल्याने महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये जुन्याच रखडलेल्या प्रकल्पाचे काम मार्गी लावण्यावर भर दिला आहे. त्यामध्ये कळवा तिसरा खाडी पुलाच्या कामाचाही समावेश आहे. या पुलाच्या कामाचा एकूण खर्च १८७.३६ कोटी रुपये इतका आहे. त्यापैकी १२५ कोटी रुपये यापूर्वीच ठेकेदाराला पालिकेने दिले आहेत. तर गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात ९ कोटी ९२ लाख, जानेवारीत ४ कोटी ३६ लाख आणि फेब्रुवारी महिन्यात ३ कोटी ८३ लाख रुपये ठेकेदाराला दिले आहेत. याशिवाय, ४ कोटी ५७ लाख रुपये मार्च महिन्यात देण्यात येणार असून उर्वरित ३९ कोटी ५२ लाखांची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे.

चार वेळा डेडलाईन संपूनही अपूर्ण काम- कळवा खाडीवर २.२ कि.मी लांबीचा सिलिंक बांधण्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे . २०१४ साली सुरू झालेल्या या पुलाचे २०१७ साली 36 महिन्यात पूर्ण व्हायला हवे होते. मात्र, त्यानंतर पाच वर्षे होऊन गेले तरी तारीख ते तारीख सुरू आहे. मार्च २०१८ त्यानंतर सप्टेंबर २०१९ नन्तर डिसेंबर २०१९ चा वायदा करण्यात आला होता. मग गेल्या वर्षीच्या ऑगस्ट 2021 महिन्यात ब्रिज वाहतुकीसाठी खुला होईल, असे सांगण्यात येत होते. आता मे 15 2022 ही डेडलाईनदेखील पुढे ढकलली आहे. जून 2022 पर्यंत एक मार्गिका खुली करण्याची पाचव्यांदा डेडलाईन मिळाली आहे.

सकाळ संध्याकाळ नागरिकांना होतो त्रास- कळवा गाव आणि ठाणे शहराला जोडण्यासाठी इंग्रज सरकारने १८६३ साली ऐतिहासिक पूल बांधला होता. परंतू हा पूल आता दुरूस्तीपलिकडे गेला आहे. तसेच तो हेरीटेज घोषीत करण्यात आला असल्याने पुलावरून पूर्णपणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाला समांतर नवा पूल १९९५ ला बांधण्यात आला. मात्र नव्या पुलावर मुंब्रा, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, पुणे या शहराकांडे जाण्यासाठी अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्याचा वाहतुकीचा मोठा ताण पडत आहे .पहाटेपासून रात्री उशीर पर्यंत या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

जून अखेरीस नवीन डेडलाईन- १५ मे पर्यंत किमान एकेरी वाहतूक सुरु करण्याचे आयुक्तांचे होते आदेश
कळवा पूलाचा १०० मीटर लांब व १७.५ मीटर रुंदीचा १०५० टन वजनाचा सांगाडा मार्च २०२१ मध्ये १४ मीटरपर्यंत उचलून पुलाच्या पीलरवर ठेवण्यात आला. त्यानंतर या सांगाड्यात कॉक्रिट टाकून पूल तयार करण्याचे काम सुरू आहे. या पुलाच्या कामाची मार्च महिन्यात आयुक्तांनी पाहणी केली आहे. पहिल्या टप्प्यात १५ मे पर्यंत ठाणे स्टेशनकडून येणारी आणि शिवाजी हॉस्पिटल समोर उतरणारी किमान एकेरी मार्गिका तरी सुरु करा असे आदेश डॉ. बिपीन शर्मा यांनी प्रशासनाला दिले होते. मात्र अद्याप काम सुरू असल्याने वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही. आता ही एक मार्गिका जून अखेरीस पूर्ण होईल असा अंदाज प्रशासनाने वर्तवला आहे.

काम अंतिम टप्प्यात असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा- पुलासाठी आवश्यक असलेल्या मेरिटाईन बोर्ड, वन विभाग महसूल विभाग, जेल ओथोरिटी सीआरझेड कलेकटर परवानग्या या टप्प्याटप्याने मिळवण्यासाठी वेळ लागला कामात अनेक अडथळे आले आहेत. त्यामुळे कामाला उशीर झाला असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. आता हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच नागरिकांना वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळेल, असा आत्मविश्वास अधिकाऱ्यांनी वक्त केला आहे.

आणखी एक नवीन मार्ग - हा पूल जेथे उतरत आहे. तो भाग विटावा रेल्वे पुलाचा भाग आहे. तो पूल अरुंद असल्यामुळे आता पालिका प्रशासन रेल्वे रुळावरून नवीन पूल विटावा येथे उतरावाणार आहे. ही मार्गिका कळवा नाक्यावर तयार होणाऱ्या पुलावर जोडली जाणार आहे. त्यासाठी 161 कोटींचा खर्च वाढणार आहे. पण अंदाजे 2 वर्षात हा आणखी एक मार्गिका तयार झाल्यावर नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.