ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. तत्पूर्वी शपथ घेण्या अगोदर जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या भावना ईटीव्ही भारत जवळ व्यक्त केल्या. मंत्रीपदाची जबाबदारी असो की इतर कोणतेही कारण, परंतु पवार साहेबांचा फोन आल्यावर छातीत धडधडायला होते, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... भाजपशी संबंध तोडा; ओवैसींचे नितीश कुमारांना आवाहन
माझ्या कार्यकर्त्यांमुळे मी आज आहे. राज्यात अनेक मोठ्या उद्योगपतींची कारखानदारांनाची मुले असतानाही माझ्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांला पवार साहेबांनी गेली ३२ वर्षे करंगळीला धरुन राजकारणात पुढे आणले. त्यामुळे मी पवार साहेबांचा नेहमीच ऋणी राहिल असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... अजित पवार तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री, पाहा संपूर्ण यादी
माणसाने आपली जागा ओळखावी त्याने कधीच आपली पायरी सोडू नये. सदैव आपण ज्या गरीबीतून दिवस काढलेत त्याला विचार करावा, म्हणजे नेहमीच सर्व परिस्थिती सोपी होत जाते. दुसऱ्यांचा नेहमी विचार करावा. मी माझ्या विचारांशी माझ्या नेत्यांशी नेहमी एक निष्ठ राहिलो आहे. गरीबांचा नेहमी विचार करावा, सगळे प्रश्न सोपे होत जातात. माझे आजचे यश, आजचा दिवस आई वडिलांना पहायला मिळाला नाही. मात्र, नशिबाने माझ्या मुलीला आजचा दिवस पहायला मिळत आहे. किंबहुना तिच्याच नशिबाने हे सर्व होत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... औरंगाबादला दोन मंत्रिपदे; अब्दुल सत्तार अन् संदीपान भुमरेंची वर्णी
साहेबांचा फोन म्हणजे हृदयात धडधड
शरद पवार साहेबांचा फोन कधीही येवो, कसाही येवो परंतु, नेहमीच छातीत धडधड होते. त्यांच्याबद्दलची भीती युक्त आदर हे माझ्या आजच्या यशाचे गमक आहे, असे आव्हाड यावेळी म्हणाले. मला मंत्री पद मिळत आहे, हेच माझे नशीब आहे. मला वेगळी अभिलाषा नसल्याचेही त्यांनी सांगितले.