ETV Bharat / city

मदरशात छापे मारा पाहा काय मिळते?; मनसे प्रदेश सचिवांचा सवाल

मशिदीवरील भोंगे खाली उतरण्यासाठी पाडव्याच्या सभेला राज ठाकरे यांनी भाषणात जाहीर केले. त्यातच इरफान शेख यांनी राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर सभेच्या दुसऱ्याच दिवशी नाराजी व्यक्त केली होती.

irfan shaikh
irfan shaikh
author img

By

Published : Apr 14, 2022, 7:38 PM IST

ठाणे : मुस्लिम द्वेषाच्या धंद्यांवर ज्यांचे राजकारण चालतं. त्यांना मस्जिदच्या भोंग्यापासून त्रास होतो. मदरशांना बदमान करायचं काम त्यांचे आहे. अशा शक्तींच्या मागे आपल्याला जायची गरजच का आली ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला का असल्या राजकारणाची गरज का पडली? असा सवाल राज ठाकरे यांना करत मनसेचे प्रदेश सचिव इरफान शेख यांनी केला आहे. त्यांनी पदाचा राजीनामा देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शेवटचा 'जय महाराष्ट्र' केला आहे.

irfan shaikh
राज ठाकरेंसोबत
पक्षाध्यक्षच जर भूमिका घेत असतील तर
पाडव्याच्या दिवशी राज ठाकरे यांनी भाषण केले होते. त्यातच इरफान शेख यांनी राज ठाकरेंच्या त्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर सभेच्या दुसऱ्याच दिवशी नाराजी व्यक्त केली होती. आणि आज राजीनामा देत इरफान शेख म्हणतात की, खरं तर अशी परिस्थिती समोर येईल. मात्र, आपण ज्या पक्षात काम करतो. ज्या पक्षाला आपलं सर्वस्व समजतो. तोच पक्ष समाजाविरुध्द वाईट भूमिका घेत असल्यास जय महाराष्ट्र म्हणण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा - Bhandara Girl Rape : धक्कादायक! धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग, आरोपीला अटक

विकासाची 'ब्लु प्रिंट' ते मस्जिदीवरील भोंगे -मदरसापर्यंत इरफान शेख यांनी १६ वर्ष मनसेचे पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. तेव्हापासून राज ठाकरे यांच्या मनातील ब्लु प्रिंट,विकासाच्या भव्य दिव्य कल्पना एक दिवशी अचानक मस्जिदीवरील भोंगे आणि मदरसांवर येऊन थांबतात. तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता म्हणून काहीतरी चुकीचं घडतंय हे सहज लक्षात येते. पक्ष स्थापन झाल्यावर भूमिका होती की, जातीपाती विरहित राजकारण करायचं. म्हणून सर्व जाती धर्माचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षात आहेत. आणि जीवतोड मेहनत देखील करत आहेत. पक्षाचा झेंडा देखील सर्वसमावेशक होता. राज साहेब ठाकरे म्हणजे आशेचा एक नवा किरण होते...
म्हणे मदरस्यात छापे मारा पहा काय काय मिळत
इरफान शेख पुढे म्हणतात की, राज साहेब कित्येक गोरगरिबांच्या मुलांचे मदरसात शिक्षण घेत होते. तिथे कधीच काही चुकीचं होत नाही. नसेल तर माझ्या सोबत चला मी दाखवतो. मात्र, बदनामी का ? मी ही एक राष्ट्रप्रेमी महाराष्ट्रातील मराठी मुसलमान आहे. एखाद्या समाजाला टार्गेट करून राजकारण करणं चुकीचं आहे. आणि त्या चुकीच्या गोष्टीत त्याच पीडित समाजाचा भाग म्हणून सहभागी होणे म्हणजे स्वतःशीच बेईमानी करण्यासारखे आहे. त्यामुळे पक्षाच्या पदाचा प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे राजीनामा पत्रात नमूद केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.