ठाणे - ठाण्यात होल्टस कंपनीच्या भूखंडावर आणि शेठ ग्रुप बिल्डरच्या वाहनतळावर ३६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या कोविड सेंटरवर भाजप नेते आणि भाजप नगरसेवक संजय वाघुले यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी १६ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत माजी खासदार किरीट सोमय्या आणि संजय वाघुले यांनी केलेल्या आरोपाच्या विरोधात १०० कोटीच्या अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. यामुळे ठाण्यात कोव्हीड सेंटरवरून शिवसेना आमदार आणि भाजप नगरसेवकांमध्ये आरोपांचे युद्ध सुरु झाले आहे.
माजी खासदार सोमय्या यांचा आरोप-
राज्य शासन, सिडको, एम.एम.आर.डी.ए. व ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये व्होल्टास कंपनीच्या भुखंडावर व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर जे दोन कोविड सेंटर उभारले जात आहेत. त्यापैकी व्होल्टास कंपनीच्या भुखंडावर उभारण्यात येणाऱ्या कोविड सेंटर बाबत आक्षेप घेतलेला आहे. व एका प्रतापी आमदाराच्या आग्रहास्तव ह्या कोविड सेंटरचे काम चालू आहे, असा आरोप माजी खासदार सोमय्या आणि भाजप नगरसेवक वाघुले यांनी केला.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा खुलासा-
मात्र, कोविड सेंटर ही राज्य शासनाने दिलेल्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात येत असल्याचा खुलासा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केला. व्होल्टास कंपनीच्या जागेवरील कोविड सेंटरचा खर्च अंदाजे १३ कोटी व शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या कोविड सेंटरचा खर्च २३ कोटीचा खर्च होणार, असल्याची महापालिकेची माहिती आहे. आरोप करणारे संजय वाघुले ज्या ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. त्याच पालिकेच्या महासभेत आणि स्थायी समितीत दोन्ही विषयांना मंजुरी दिली असल्याचंही उल्लेख आमदार प्रताप सरनाईक यांनी निवेदनात केला आहे.
तर नगरसेवक संजय वाघुले यांनी खोपट येथील हायवेनजीक असलेल्या देवकार्पोरा इमारतीमधील शेठ ग्रुपच्या वाहन तळावर होत असलेल्या कोविड सेंटरच्या कार्यालयातील कन्सलटन्ट बरोबर त्यांची बैठक झाल्याची माहिती सी.सी. टिव्ही फुटेजचा पुरावा असल्याचा दावा केला आहे.
माजी खासदार किरीट सोमय्या व नगरसेवक संजय वाघुले या दोघांचीही चौकशी करावी-
शेठ ग्रुपच्या जागेवरील कोविड सेंटरला आक्षेप न घेता संजय वाघुले यांनी होल्टस कंपनीच्या भूखंडावर असलेल्या कोविड सेंटरला आक्षेप नोंदविल्याने यात भ्रष्टाचार होत नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणी आपण माजी खासदार किरीट सोमय्या व नगरसेवक संजय वाघुले या दोघांचीही चौकशी करावी अशा मागणीचे पत्र आमदार प्रताप सरनाईक यांनी लाललुचपत प्रितबंधक विभाग, ठाणे. पोलीस अधिक्षक, महेश पाटील याना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे
हेही वाचा- लसीकरणाला लवकरच सुरुवात, केंद्राने लस मोफत द्यावी- राजेश टोपे