ठाणे - भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या रुग्ण संख्येत आता दिवसागणिक वाढ होत असून शहर व ग्रामीण भागातील एकूण रुग्ण संख्या पंधरावर पोहचली आहे. बुधवारी सायंकाळी उशिरा ग्रामीण भागातील कोनगाव येथील एका 46 वर्षीय कर्करोगग्रस्त महिलेचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. राहनाळ ग्रामपंचायत हद्दीतील चरणीपाडा येथे एका 62 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे उघड झाले आहेत. ही रुग्ण महिला दमा विकारावर खासगी रुग्णालयात उपचार घेत असताना लॅबचा रिपोर्ट कोरोना पोझिटिव्ह आला आहे. बुधवारी या महिलेच्या घरातील पाच जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी या महिलेच्या संपर्कातील आणखी दहा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. या दोन्ही महिलांच्या पॉझिटिव्ह रिपोर्टमुळे ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8 झाली आहे.
तर आज गुरुवारी शहरातील कणेरी येथील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोना झाल्याचे सष्ट झाले आहे. हा रुग्ण डायबीडीजच्या उपचारासाठी नवी मुंबई येथील रुग्णालयात दाखल झाला होतो. आता तो भिवंडीतील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला असता या रुग्णाचे कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 7 वर पोहचली आहेत. तर या व्यक्तिच्या घरच्यांना व त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात येणार असून सदर कोरोनाबाधित रुग्ण ज्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होता तो दवाखाना व रुग्ण राहत असलेला परिसर देखील सील करण्यात येणार असल्याची माहिती मनपाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जयवंत धुळे यांनी दिली आहे.
दरम्यान भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची एकूण रुग्ण संख्या आता 15 वर पोहचली आहे.