ETV Bharat / city

DG THANE : ठाणे महानगरपालिकेच्या डिजीटल प्रणालीने पार केला १ लाख नोंदणीदाराचा टप्पा

नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत डिजीठाणे या डिजीटल प्रणालीने १ लाख नोंदणीचा टप्पा नुकताच पार केला आहे.

author img

By

Published : Mar 31, 2019, 2:47 PM IST

ठाणे महानगरपालिका ११

ठाणे - डिजिटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत डिजीठाणे या डिजीटल प्रणालीने १ लाख नोंदणीचा टप्पा नुकताच पार केला आहे. यापुढेही पालिकेच्या डिजीटल उपक्रमाला ठाणेकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन स्मार्टसिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांनी केले आहे.

ठाणे महानगरपालिका

गेल्या वर्षभराच्या कालावधीत डिजीठाणेने ठाणे महानगरपालिकेला आणि नागरिकांना एकमेकांशी सुसंवाद साधण्याचा नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे. त्याची उपयुक्तता नागरिकांच्या लक्षात आल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी डिजीठाणे आपल्या मोबाईल व इतर उपकरणांत डाऊनलोड केले आहे. त्यामुळे डिजीठाणे प्रणाली आता ठाण्यातील १ लाख नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचली आहे. या डिजीटल प्रणालीद्वारे ४ लाखांहून अधिकवेळा ठाणेकरांनी ठाणे महापालिकेशी दुहेरी संवाद साधला आहे.

डिजीटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ठाणे महापालिकेच्या नव्या वेगवेगळ्या योजनांबरोबरच ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडीचीही माहिती तात्काळ मिळते. नामांकित दुकाने, हॉटेल्स यांची डिस्काऊंट कुपन्सही या माध्यमातून दिली जातात. आरोग्याबद्दल सजग असलेल्या ठाणेकरांना आरोग्य उत्तम राखण्यातही डिजीठाणेचे सहाय्य होत असून शैक्षणिक माहितीही याद्वारे उपलब्ध होत आहे.

डिजीठाणेने गेले वर्षभर राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. ठाण्यात कोणते उपक्रम राबविणे गरजेचे आहे हे डिजीठाणेच्यावतीने सर्वेक्षणाच्या माध्यमातून ठाणेकर नागरिक सूचवत असतात. यामध्ये ठाण्यातील शाळकरी मुले, युवक, नोकरदार ते सेवानिवृत्त कर्मचारी या सर्वांनाच हे उपयुक्त ठरतील असे उपक्रम ही डिजीटल प्रणाली राबवत असते.

पक्षाघात व त्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती देणारी कार्यशाळा, योगप्रशिक्षण शिबीर, शाळकरी मुलांसाठी प्रश्नमंजुषा, रक्तदानासाठीचे उपक्रम, राम मारुती रोडवरील शॉपिंग फेस्टिवल, ठाणे युथ आयकॉन स्पर्धा, डिजीमित्र वेबसेमिनार मालिका, छायाचित्र स्पर्धा, क्रिकेट अंदाज स्पर्धा, असे अनेक उपक्रम डिजीठाणेद्वारे आयोजित करण्यात आले. या सर्व उपक्रमाला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. डिजीठाणेच्या पुढील सर्व उपक्रमाला ठाणेकरांनी प्रतिसाद द्यावा, असे आवाहन ठाणे महापलिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Intro:डिजीठाणेने पार केला १ लाख नोंदणीचा टप्पा

महापालिकेच्या डिजिटल उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे ठाणे स्मार्टसिटी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहनBody:

डिजिटल युगात ठाण्यातील नागरिकांसोबत विविध योजनाच्या माध्यमातून थेट संवाद साधणाऱ्या ठाणे महापलिकेच्या स्मार्टसिटी अंतर्गत डीजीठाणे या डिजिटल प्रणालीने १ लाख नोंदणीचा टप्पा नुकताच पार केला असून यापुढेही पालिकेच्या डिजिटल उपक्रमाला ठाणेकरांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन ठाणे स्मार्टसिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांनी केले आहे.
गेल्या वर्षभराच्या कालावधीत डिजीठाणेने ठाणे महानगरपालिकेला आणि नागरिकांना एकमेकांशी सुसंवाद साधण्याचा नवा मार्ग उपलब्ध करून दिला. त्याची उपयुक्तता नागरिकांच्या लक्षात आल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी डिजीठाणे आपल्या मोबाईल व इतर उपकरणांत डाऊनलोड केले आहे. त्यामुळे डिजी ठाणे प्रणाली आता ठाण्यातील एक लाख नागरिकांच्या घरापर्यंत पोहचली आहे. या डिजिटल प्रणालीद्वारे चार लाखांहून अधिक वेळा ठाणेकरांनी ठाणे महापालिकेशी दुहेरी संवाद साधला आहे.
या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून नागरिकांना ठाणे महापालिकेच्या नव्या वेगवेगळ्या योजनांबरोबरच ठाण्यातील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडीचीही माहिती तात्काळ मिळते. तसेच ठाण्यातील नामांकित दुकाने, हॉटेल्स यांची डिस्काऊंट कुपन्सही या माध्यमातून दिली जातात.आरोग्याबद्दल सजग असलेल्या ठाणेकरांना आरोग्य उत्तम राखण्यातही डिजीठाणेचे सहाय्य होत असून शैक्षणिक माहितीही याद्वारे उपलब्ध होत आहे.
डिजीठाणेने गेले वर्षभर राबविलेले अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम ठाणेकर नागरिकांमध्ये लोकप्रिय ठरले आहेत. ठाण्यात कोणते उपक्रम राबविणे गरजेचे आहे हे डिजीठाणेच्यावतीने सर्वेक्षणाच्या माध्यमातून ठाणेकर नागरिक सूचवत असतात. यामध्ये ठाण्यातील शाळकरी मुले,युवक,नोकरदार ते सेवानिवृत्त कर्मचारी या सर्वानाच हे उपयुक्त ठरतील असे उपक्रम ही डिजिटल प्रणाली राबवत असते. यामध्ये पक्षाघात व त्याची काळजी कशी घ्यावी याची माहिती देणारी कार्यशाळा, योगप्रशिक्षण शिबीर, शाळकरी मुलांसाठी प्रश्नमंजुषा, रक्तदानासाठीचे उपक्रम, राम मारुती रोडवरील शॉपिंग फेस्टिवल, ठाणे युथ आयकॉन स्पर्धा , डिजीमित्र वेबसेमिनार मालिका, छायाचित्र स्पर्धा, क्रिकेट अंदाज स्पर्धा असे अनेक उपक्रम डीजीठाणेद्वारे आयोजित करण्यात आले.या सर्व उपक्रमाला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या या उपक्रमांचे दिल्लीत झालेल्या स्मार्ट सिटी सीईओंच्या परिषदेतही कौतुक करण्यात आले आहे. ठाणेकरांच्या या प्रचंड प्रतिसादामुळे येत्या काळातही डिजीठाणेचे पुढील उपक्रम यशस्वी होतील. डीजीठाणेच्या पुढील सर्व उपक्रमाला ठाणेकरांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन ठाणे महापलिकेच्यावतीने करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.