ETV Bharat / city

दरेकरांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे ठाण्यात जोडे मारो आंदोलन - Darekar's statement

प्रवीण दरेकर यांनी काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची सवय आहे. असे, वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाण्यात प्रवीण दरेकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

दरेकरांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे ठाण्यात जोडे मारो आंदोलन

author img

By

Published : Sep 16, 2021, 6:40 AM IST

ठाणे - विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काल एका कार्यक्रमात राष्ट्रवादी पक्षाला रंगलेल्या गालाचे मुके घेण्याची सवय आहे. असे, वादग्रस्त विधान केले होते. त्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ठाण्यात प्रवीण दरेकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. सुरेखा पुणेकर या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रवेशावर बोलत असताना, दरेकर यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टिपण्णी केली होती.

प्रवीण दरेकरांच्या 'त्या' वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे ठाण्यात जोडे मारो आंदोलन

'येत्या 48 तासात केलेल्या विधानाबद्दल माफी मागा'

या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला 3 कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. तसेच, त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले. प्रवीण दरेकर यांनी भान ठेवून बोलावे. जर त्यांनी येत्या 48 तासात केलेल्या विधानाबद्दल माफी मागितली नाही. तर, महिला राज्यभर तीव्र आंदोलन करतील, असा इशारा राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकारी यांनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.