ठाणे : मुरबाड (Murbad Flood News) हुन वाशिंद कडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिखले गावातील काळू नदीवरील (Kalu River was flooded) पूल पुराच्या पाण्याखाली गेला. यामुळे शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्याचा सुमारे १८ गावपाड्यांचा (18 villages were cut off ) संपर्क पहाटेपासून तुटला आहे. यामुळे गावाकडील शहरांकडे जाणाऱ्या चाकरमानीसह दूध, भाजी विक्रेते अडकून पडले आहे.
नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ : पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्या मार्फत देण्यात आला आहे. या वाढत्या पातळीवर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेवून आहे. ज्या ठिकाणी पुराचा जास्त धोका आहे, त्या ठिकाणच्या रहिवाश्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनांकडून सांगण्यात आले. काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. डोंगर भागातील घाट माथ्यावर सततच्या मुसळधार पावसामुळे पाणायामुळे नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार: गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावलेली असतांना, ९ जुलै पर्यंत जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी स्थानिक यंत्रणांना भुस्खलन होऊ शकणाऱ्या गावांची आणि क्षेत्रांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करण्यास सांगितला आहे. तसेच, तेथील स्थानिक जनतेला त्याबाबत माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अनेक गावपाड्यांचा संर्पक तुटला: शिरगाव, चिखले, झापवाडी, मुरबाड हे गाव पुराच्या पाण्याखाली गेलेले आहेत. शिवाय शहापूर तालुक्यातील शेरा , अंबरचा मड, मासवणे, बावघर ,भय या गावांचा संपर्क तुटला आहे. या गावाच्या आसपास असलेल्या अनेक गावपाड्यांचा टिटवाळा, वाशिंद मुरबाड, शहापूर शहरांशी संर्पक तुटला आहे.