ठाणे - भिवंडी तालुक्यातील दापोडे गावात एका लाकडाच्या पॅलेट गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत गोदामातील लाखोंच्या लाकडी पॅलेट जळून खाक झाल्या. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 1 गाडीसह पाण्याच्या टँकर दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे.
भिवंडी तालुक्यातील दापोडे गावातील शिवसेना शाखे समोर लाकडाच्या पॅलेटीचे गोदाम आहे. या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक आग लागली. गोदामाला आग लागल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच त्यांनी भिवंडी अग्निशमन दलाच्या कार्यालयाशी संपर्क करून माहिती दिली. माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाची १ गाडीसह पाण्याचा टँकर दखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे जवानांकडून प्रयत्न सुरू होते. मात्र, आग गोदामाच्या लगत असलेल्या विद्युत पोलवरील तारांपर्यत पोहचल्याने या आगीत विद्युत पोलवरील तारा तुटून खाली पडल्या होत्या. त्यामुळे परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. आगीचे स्वरूप पाहता. दापोडे गावातील आणखी २ पाण्याचे टँकर मागवण्यात येऊन तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविले. गोदामात आग लागली त्यावेळी कोणीही कामगार नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, या भीषण आगीत गोदामातील लाखोंचे लाकडी साहित्य जळून खाक झाले.
आगीची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे पथकहि घटनास्थळी दाखल झाले. हे पोथक परिस्थितीवर लक्ष देऊन होते. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आगीचे नेमके कारण काय याचा तपास पोलीस करत आहेत.